लाजरी फाऊंडेशनच्या माध्यमातून कँन्सर मुक्त भारत करण्याचा निर्धार
सर्वतोपरी मदत करणार – खा. धैर्यशील माने
जयसिंगपूर येथील लाजरी सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून 3 जानेवारी माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पासून ते 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत,शिरोळ तालुक्यातून कँन्सर जनजागृतीचा अभियान राबवला या लाजरी फाऊंडेशनच्या परिवर्तन अभियानाची सांगता राजामाता जिजाऊ जयंती ने करण्यात आला. या दहा दिवसांच्या अभियानात शिरोळ तालुक्या मध्ये 4200 नागरीकांची भेट घेतली. कँन्सर पासून आपण कसे बचाव करू शकतो तसेच इतर आजाराला सुध्दा आपण कसे थांबवू शकतो हे सर्व लाजरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सांगण्यात आले.अशा या परिवर्तन अभियानांचा अनुभव सांगत असताना, डॉ अतिक पटेल फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य मिळाले व तालुक्यातील कॅन्सर परिस्थिती खूप बिकट आहे असे नितीन गोसावी.अधक्ष, आपल्या प्रास्ताविकात म्हणाले सौ. राधिका सावंत या देखील कँन्सर मुक्त भारत बनवणयाचे फक्त स्वप्न बघून चालणार नाही.तर या करीता जमिनीवर उतरून तळागाळातील जनतेची आरोग्या विषयी चौकशी केली पाहिजे.हे सांगत असताना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवांच्या जयंती डोक्यावर घेऊन साजरे न करता.त्यां सर्व महामानवांचे जीवन चरित्र वाचून डोक्याने जयंती साजरी केली पाहिजे. तर याठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी सुध्दा लाजरी फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.आणि आज अशा अभियानांची महाराष्ट्र भर गरज आहे. असे बोलून आम्ही लाजरी फाऊंडेशनच्या अशा कार्यास सहकार्य करण्यास तयार आहे. असे आश्वासन दिले.
सायबर कॉलेज चे समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दीपक भोसले सर अध्यक्ष म्हणून लाभले त्यांनी सदर कामाचे कौतुक केले.या कार्यक्रमात संशयित रुग्णांची तपासणी डॉ. विकासगोसावी. (कॅन्सर हॉस्पिटल, मिरज) – आणि
डॉ. सतीश पाटील, कोल्हापूर. यांनी केली व बहुमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.अतिक पटेल,डॉ.सज्जन गोसावी,माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे,
मेघा खामकर ( NULM अधिकारी) जयश्रीताई पाटील (जयश्री पाटील युवामंच)त्याचबरोबर लाजरी सोशल फाउंडेशन चे पदाधिकारी स्मिता सम्यक.उपाध्यक्ष
अभिजीत नांद्रेकर व ज्ञानगंगा हायस्कूलचे व गर्ल हायस्कूल चे विदयार्थी उपस्थित होते.