पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या लव जिहाद प्रकरणातील शाहिद समीर सनदे आणि शाहरुख हुसेन देसाई यांना हातकणंगले पोलीसांच्या हवाली करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते खासदार किरीट सोमय्या यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या सह हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जयसिंगपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आणि तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी खासदार सोमय्या यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले आरोपीनी दोनहून अधिक मुलींना फसवलं आहे.माफीनामा हे नाटक आहे. प्रकरणा संदर्भात उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून अजून मोबाईल, ॲप्स यांची तपासणी करायची आहे, महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात हे सहावे प्रकरण लव्ह जिहाद चे आहे. सगळेच ठिकाणी आरोपी हे मुस्लिम माफीया आहेत. त्या माफी यांची टोळी आहे त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय, मालेगावहून आर्थिक सपोर्ट दिला जातोय, या सर्व ठिकाणचे आरोपी हे कट्टर पंथीय धर्मांध मुस्लिम माफीयांचे काम आहे.पीडित मुली आणि त्याचा परिवार पुढे आल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले आहे अशाच पद्धतीने धाडसाने पुढे येऊन तक्रारी करणे गरजेचे आहे त्यांची ओळख गुपित ठेवण्यात येतील. यासह आरोपी संदर्भात अन्य विषयावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली. या वेळी आम अशोक माने, भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, हातकणंगले मंडल अध्यक्ष शितल हावळे, पेठवडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, हातकणंगले शहर अध्यक्ष अमर इंगवले, बाळासाहेब गारे, शिरोली सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, दीपक यादव, अर्जुन चौगुले, संदीप तानवडे,विनोद खिलारी, रावसाहेब चौगुले, संजय नंदीवाले, ,नगरसेवक रोहीत निगवे, अभि लुगडे, पंकज बुड्डे, सुदेश मोरे, दीनानाथ मोरे,रमजान मुजावर, संजय दुगंगे,प्रशांत येटाळे, अभिजित आरोडे, , संतोष कांबळे, सुभाष कुंभार, राजु इंगवले, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.