पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
अश्लील व्हिडिओ करून लैंगिक शोषण केलेल्या आरोपीच्या बंगल्या मध्ये बांधलेल्या जिन्याचे अतिक्रमण शिरोली ग्रामपंचायतीने बुधवारी काढून टाकले. तसेच त्याच्या बंगल्याची प्रॉपर्टी कार्डनुसार मोजणी करून रस्त्यामध्ये केलेले अतिक्रमण बांधकाम ही पाडणार असल्याची माहिती माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी दिली.पुलाची शिरोली येथील शाहिद समीर सनदे व शाहरुख हुसेन देसाई या तरुणांनी हिंदू धर्मातील १५ हुन अधिक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून व आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. तसेच या मुलींशी शरीरसंबंध ठेवून त्याचे चित्रीकरण केले आहे.हे चित्रीकरण सोशल मीडियावर पाठविण्याची धमकी देऊन त्यांना वारंवार शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले आहे.याप्रकरणी हातकणंगले पोलीसांनी अटक केलेल्या शाहीद सनदे व शाहरुख देसाई यांना अटक केली आहे.त्यांच्या निषेधार्थ मंगळवारी गाव बंद आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमल महाडिक यांनी आरोपींना तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या अपराधी लोकांनाही अटक करून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत कायदेशीर व सनदशीर मार्गाने आपण लढा देऊया असे सांगितले होते.त्यास अनुसरून शिरोली ग्रामपंचायतीने सनदे व देसाई यांच्या घरातील नळ कनेक्शन तोडले आहेत तसेच त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण कार्यालयाला अर्ज दिला आहे. बुधवारी सकाळी सनदी याच्या बंगल्याकडे ला रस्त्यावर अतिक्रमण करून घरात येजा करण्यासाठी जिना बांधला आहे. हा जिना बुधवारी सकाळी आंदोलनाचे संघटक व माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, अविनाश कोळी, दीपक यादव, बटील देसाई आदींच्या उपस्थितीत ब्रेकरच्या साह्याने काढून टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर टोप येथील नगर भूमापन कार्यालयातून त्याच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड काढून त्याची मोजणी करण्यात येणार आहे. यामध्ये अतिक्रमण करून केलेले बांधकाम पाडणार असल्याचे करपे आणि सांगितले. तसेच सनदे व देसाई यांचा शेतातील पाणीपुरवठा बंद करणे, त्याच्या शेतामध्ये मशागतीसाठी तसेच रोजगारासाठी गावातील एकाही व्यक्तीने जाऊ नये. असा निर्णयही गाव सभा घेऊन घेण्यात येणार असल्याची माहिती करपे यांनी आमची मराठी संवादशी बोलताना दिली.
सनदे याची गृहोपयोगी वस्तूंच्या आडून सावकारी !
शाहीद सनदे याचे वडील समीर सनदे हे किराणा मालाचे दुकान चालवतात. त्याच्या दुकानांमध्ये गृहपयोगी साहित्य खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याच्या दुकानात आर्थिक कमकुवत असलेल्या कुटुंबांचा व्यवहार अधिक आहे. याचा गैरफायदा शाहीद सनदे याने घेतला असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू झाली आहे. तसेच घरगुती प्रापंचिक साहित्य विक्रीचे घराच्या बेसमेंटमध्ये मोठे शोरूम आहे. या शोरूम मध्ये लाकडी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू (टीव्ही फ्रिज मिक्सर फॅन कुलर कपाटे टेबल खुर्च्या शोकेस) यासारख्या अनेक वस्तू तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. या वस्तू विक्री पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, रांगोळी, सांगाव, लिंगनूर, करनूर, शेंडूर, गोकुळ शिरगाव परिसर, वाळवा तालुका तसेच पन्हाळा परिसर आदी ठिकाणी पाठविले जातात या विक्रीच्या माध्यमातून त्याने भिशीची पठाणी सावकारकी मोठ्या प्रमाणात चालवली जात आहे. उदाहरणार्थ पाच हजार रुपयाची एक वस्तू विकल्यास पाच वर्षे प्रत्येक आठवड्याला शंभर रुपये भिशी म्हणून जमा करून घेतले जातात. म्हणजे महिन्याला पाचशे रुपये तर वर्षाला साडेपाच हजार रुपये असे पाच वर्षाचे मिळून २५ ते २७ हजार रुपये हे सनदे कुटुंब आर्थिक कमकुवतपणा असलेल्या लोकांच्याकडून गोळा करतात. या सर्व बाबींचीही पोलीस प्रशासनाने त्याच्या घराची झडती घेऊन तपासणी करावी. अशी मागणी शिरोलीतील हिंदुत्ववादी संघटनेच्या कडून होत आहे.