चोरट्यांचा धुमाकूळ,सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

कुरुंदवाड येथील दत्तनगरमधील त्रिमूर्ती नायकु सुर्यवंशी यांच्या घरांत कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम ७५०० रुपयांसह ६० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.बुधवारी (दि.१०) मध्यरात्री ही चोरीचा घटना घडली.चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस

 

आला.याबाबतची फिर्याद त्रिमूर्ती सुर्यवंशी यांनी येथील पोलिसांत दिली आहे.दत्तवाड (ता.शिरोळ) येथे नदीवेस रस्त्यावर असलेल्या नेमिनाथ आण्णू मुरगुंडे यांच्या घराचे कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू चोरुन नेले आहेत.मुरगुंडे यांनी कुटुंबासह चार दिवसांपासून इचलकरंजी येथे वास्तव्यास

 

आहेत.मात्र घरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत.सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार सुर्यवंशी शहरालगत असलेल्या दत्तनगरमध्ये वास्तव्यास आहेत.घरी कोणी नसल्याचे ओळखून अज्ञात चोरट्यांनी

 

गुरुवारी मध्यरात्री घराचे कडी कोयंडा उचकटून घरातील कपाटातील रोख रक्कम,सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याच प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे करीत आहेत.

error: Content is protected !!