शिरोळ शहर व परिसरात भारतीय संविधान दिन साजरा

Spread the love

शिरोळात संविधान दिन साजरा

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ शहर व परिसरात भारतीय संविधान दिन साजरा झाला यानिमित्ताने सामूहिक संविधानाचे वाचन करण्यात आले ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब नदाफ यांनी संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले.

शिरोळ नगरपरिषद आणि पद्माराजे विद्यालयाच्या वतीने येथील शिवाजी चौकात सामुदायिक संविधान वाचन व वसुंधरा शपथ ग्रहण करण्यात आली.यावेळी नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी नगरसेवक प्रकाश गावडे तातोबा पाटील एन वाय जाधव रावसाहेब पाटील मलिकवाडे पालिकेचे प्रशासनाधिकारी लक्ष्मण लोंढे कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे सुभाष माळी सचेतन बनसोडे आप्पासाहेब पुजारी पद्माराजे विद्यालयाचे शिक्षक आनंद पुजारी वजीर गवंडी यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
ज्येष्ठ समाजसेवक बाबासाहेब नदाफ यांनी भारतीय संविधानाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शहरातील शासकीय निमशासकीय कार्यालय प्राथमिक माध्यमिक विद्यालय या ठिकाणी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला

Leave a Comment

error: Content is protected !!