गणेशवाडी / प्रतिनिधी
गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील सदभक्त मंडळ व लिंगायत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानयोगी परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यानिमित्ताने माजी निवृत्त अधिकारी इंद्र्जित देशमुख यांचे व्याख्यान तसेच विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.या अखंड पृथ्वीतलावरील एक चालते -बोलते देव म्हणून या कलियुगात संबोधले गेलेले विजापूर
(कर्नाटक)ज्ञानयोगाश्रमाचे परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांचा प्रथम पुण्यस्मरण 2 जानेवारी रोजी आहे.श्री सिद्धेश्वर आप्पाजी यांचे प्रवचन गणेशवाडी येथे झाल्याने तसेच त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणात या भागात
असून गणेशनगरीत त्यांचा पुण्यस्मरण साजरा व्हावा असा निर्णय येथील सदभक्त मंडळ तसेच लिंगायत समाजाने घेतला आहे. त्यानुसार मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी नमनांजली कार्यक्रम होईल.
त्यानंतर दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात होईल यावेळी गोमाता पूजन आप्पाजी यांच्या फोटो पूजन होऊन अभिवादन करण्यात येईल.त्यानंतर वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक, महानवक्ते इंद्रजीत देशमुख
यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे मानव जाती वर लोकांना समुपदेशन करणारे आप्पाजी यांचे सर्व जाती मध्ये भक्तगण असल्याने या कार्यक्रमास
मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. तर आयोजकांनी सर्वांना महाप्रसाद व व्याख्यानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.