राजकीय नेत्यांनी भान ठेऊन बोलले पाहिजे,अन्यथा काँग्रेस तुम्हाला जाब विचारेल

Spread the love

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळामध्ये पीएचडी मुलांबाबत एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी मुले काय दिवे लावणार असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गांधी पुतळा चौक येथे अजित पवार यांचा पोस्टर मध्ये धरणाचे काय दिवे अजित पवार यांनी लावले आहेत तसेच शिक्षणामध्ये काय दिवे लावणार असा मजकूर पोस्टर लावण्यात आला.हा पोस्टर आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला होता अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे माफी मागावी अन्यथा अजित पवार यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला.यावेळी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अजित पवार यांचा धिक्कार असो च्या घोषणा देण्यात आल्या येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांना जशास तसे उत्तर दिले जाईल अजित पवार यांनी हे केलेले वक्तव्य हे चुकीचे आहे याच्या इथून पुढे काँग्रेसकडून आक्रमकपणे भूमिका घेतली जाईल.त्यामुळे राजकीय नेत्यांनी भान ठेऊन बोलले पाहिजे असे सध्या जनतेतून आवाज उमटू लागला आहे या आंदोलनावेळी इचलकरंजी शहर युवक अध्यक्ष प्रमोद खुडे,गोविंदा आढाव,डॉ विलास खिलारे, एन.एस यू. आइचे शहर अध्यक्ष रेहान नदाफ,आदित्य खोत बिस्मिल्लाह गैबान,ज्योती भिसे, मधू म्हेतर,सचिन साठे,तोसीफ लाटकर,ओंकार आवळकर,निलेश पाटील, रमजान शिकलगार,पोपट शिंदे,चंद्रकांत मिस्त्री,मंथन सुतार,प्रेम तेरणी,सुदाम साळुंखे, अजित मिणेकर,राजू काटकर,राजू किणेकर,रवि वासुदेव,अनिल पच्छिन्द्रे प्रवीण फगरे,रजनीकांत वासुदेव,योगेश कांबळे, आलम मोमीन, मिलिंद कुरणे,,सुनील वासुदेव,स्वप्नील वाकडे, संदीप पाटील, श्री

भोसले, रत्नपारखी अवी बलिकाई,किरण कुरणे,यांच्या सह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!