दत्तनगरमध्ये दिव्यांग विद्यार्थी पालकांचा मेळावा संपन्न

Spread the love

दत्तनगरमध्ये दिव्यांग विद्यार्थी पालकांचा मेळावा संपन्न.

शिरोळ / प्रतिनिधी चंद्रकांत भाट

जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त केंद्रशाळा दत्तनगर (शिरोळ)या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.सदर मेळाव्याचे उद्घाटन व हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन शिरोळ तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी नारायण पाटील उपस्थित होते.सदर कार्यशाळेसाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना श्रीपती गंगधर व सुनंदा बंडगर/मेटकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. उपस्थित पालकांना अल्पोपहार देण्यात आला.सदर कार्यशाळेचे नियोजन पंचायत समिती शिक्षण विभाग कडील कार्यरत विषयतज्ञ व विशेष शिक्षक यांनी केले.किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सदर कार्यक्रमासाठी सर्व विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!