राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
देशाचे लोकनेते शरदचंद्र पवारसाहेब व अजितदादा एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती.त्यांनी ती बोलून ही दाखविली होती. पक्षांतर्गत भांडण वेगळे आहे.थोडा धीर धरा.लोकांच्यासाठी काम करा.लढा, प्रश्नांसाठी प्रामाणिक प्रयत्न करा.असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला.ते तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्या निवासस्थानी आयोजित शिरोळ तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये जिल्हा परिषद सदस्या अर्चना चौगुले,पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे,उपसभापती सौ.मनिषा कदम,पंचायत समिती सदस्या सौ. दिप्ती जाधव यांचा सत्कार करण्यात आला.आ.रोहितदादा पवार पुढे म्हणाले की शांत बसून चालणार नाही.चर्चा करून मार्ग निघत असेल तर चांगलेच आहे.लढा तालुका लेव्हलला काही करायचे असेल तर नक्कीच लक्ष देवू.जर विश्वासात घेत नसतील तर कोठे थांबणार नाही.त्यांनी नाहीच घेतले तर मग आपण काय करायचे ते ठरवू.विरोधकांचा समाचार घेताना म्हणाले की जेंव्हा सत्तेत येवू तेंव्हा अशा लोकांना सोडणार नाही.त्यामुळे जसे आम्ही आहोत.जसे दिसतो ते चांगले आहोत ते फक्त सामान्य लोकांसाठीच. पण जे नेते विचित्र पद्धतीने खालच्या लेव्हलला जावून राजकारण करणारे कपटी नेते आहेत त्यांच्यासाठी हिसका काय असतो ते येत्या काळामध्ये १०० % दाखवू,पाच राज्यातील निकाल हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या सिस्टीमच्या विरोधातील वातावरण होते.सिस्टीमच्या विरोधात लढताना दुसरा ऑप्शन नसल्याने भाजपाला मतदान झाले.याप्रसंगी तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे,धनाजीराव जगदाळे, डी.पी.कदम, खंडेराव जगदाळे,युवराज जगदाळे,आण्णासो क्वाणे,विजीतसिंह शिंदे,रणजित कदम,राजगोंडा पाटील,विशाल जाधव,राकेश खिरुगडे, धवलराज जगदाळे,अमर जगदाळे, दिपक जगदाळे,आप्पासाहेब जगदाळे,धैर्यशील जगदाळे,उजेंद्र इंगवले,संजय जगदाळे,रणधीर जगदाळे,प्रतिक जगदाळे, तात्यासो शिरहट्टी, ऋषिकेश पाटील,प्रशांत कदम,संदीप मोरे, किरण मोरे,सतिश भंडारे,निशांत निटवे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
कुरुंदवाड शहरातील युवा नेते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस सर्फराज जमादार यांनी आ.रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहिर प्रवेश केला.लवकरच त्यांच्यावर पक्षाची नवी जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे आ.रोहितदादा पवार यांनी सांगितले.