शिरोलीतील लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करा; किरीट सोमय्या यांचे पोलीस प्रशासनाला आदेश 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली परिसरात गाजलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाची दखल घेत खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज गुरुवारी शिरोली पोलीस ठाण्याला भेट दिली.यावेळी त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ धिरजकुमार बच्चू यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने आणि तत्परतेने करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी करवीर विभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, गुन्हे अन्वेषण विभागाचे सुरज चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक सुनील गायकवाड यावेळी उपस्थित होते .यावेळी तपासात कोणतीही कसूर राहू नये आणि खऱ्या अर्थाने दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यावेळी या चर्चेदरम्यान मालेगाव प्रकरण आणि मुस्लिम जिहादी मानसिकतेला होणाऱ्या संशयास्पद फंडिंगबाबतही विचारविमर्ष करण्यात आला. अशा प्रकरणांच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी केवळ समोरील आरोपींना पकडून न थांबता, यामागील मुख्य मास्टरमाईंडचा लवकरात लवकर शोध घ्यावा असे आवाहन सोमय्या यांनी केले.हे प्रकरण उजेडात आणणाऱ्या आणि पाठपुरावा करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे सोमय्या यांनी विशेष कौतुक केले. समाजात अशा घटना रोखण्यासाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असून, पोलिसांनी त्यांना आवश्यक ते सहकार्य आणि संरक्षण द्यावे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.यावेळी आमदार अशोकराव माने , उपसरपंच विजय जाधव, माजी उपसरपंच कृष्णात करपे , दिपक यादव , संदिप तानवडे, योगेश खवरे , यांच्यासह हिंदुत्वादी संघटनेचे व भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!