पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलाची शिरोली इथल्या यादववाडीतील आरोपी योगीराज पवार यांच्या घराच्या आडोशाला सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून पाच हजार दोनशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अधिक माहिती अशी की, यादव वाडीतील शिवाजी गल्लीत राहणाऱ्या योगीराज पवार यांच्या घराच्या आडोशाला योगीराज पवार हा मटका घेत असल्याची माहिती कोल्हापुरातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. हा मटका अड्डा ऋषिकेश चंद्रकांत पाटील यांच्या मालकीचा आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशाला हरताळ पासून हा मटका अड्डा बिन बोभाट सुरू होता. अध्यायाची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना असतानाही त्यांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. पण याबाबतची माहिती स्थानिक गुनाअन्वेषण चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाले होते त्यांनी याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश अंबी यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आंबी आणि कोळी यांनी या मटका अड्ड्यावर धाड टाकून मटक्यासाठी लागणारे साहित्य असा सुमारे पाच हजार 205 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून आरोपी योगीराज पवार आणि ऋषिकेश पाटील यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशाला हरताळ फासून या परिसरात अवैध धंदे जोमाने सुरू असून त्यांना बळ कोणाची मिळत आहे असा प्रश्न उपस्थित होत असून अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या वर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.