जोतिबा यात्रेनंतर जि प सदस्या सोनाली सावंत यांनी घेतला स्वच्छतेसाठी पुढाकार 

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

वाडी रत्नागिरी येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रेचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला.यात्रेदरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले.मात्र,यात्रेनंतर जोतिबा डोंगर परिसरात आणि कासारवाडी ते डोंगर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.यामुळे परिसराचे सौंदर्य धोक्यात आले होते.याच पार्श्वभूमीवर भादोले जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या सौ.सोनाली सावंत यांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहिम राबवली.त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन कासारवाडी ते जोतिबा डोंगर परिसरात साफसफाई केली.त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. सौ.सोनाली सावंत यांच्या या उपक्रमात स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.रस्त्याच्या कडेला साचलेला प्लास्टिक,कागद व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.“स्वच्छता हीच सेवा” या भावनेतून त्यांनी दिलेला हा संदेश अत्यंत प्रभावी ठरला.यात्रेनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून,यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.सोनाली सावंत यांच्या या कृतीने समाजासाठी एक आदर्श निर्माण केला असून, अशा उपक्रमांची गरज आज अधिक भासते आहे.त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून,स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,असा संदेश या उपक्रमातून दिला गेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!