शिरोळ येथे आम्ही सारे लोककला महोत्सवाचे आयोजन

Spread the love

दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर सादर होणार तालुक्यातील निमंत्रित लोककलाकारांचा कलाविष्कार

शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक माजी चेअरमन व माजी आमदार कैलासवासीय स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय आमदार आप्पासाहेब उर्फ

सारे पाटील यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त शिरोळ तालुक्यातील लोककलाकारांचा मेळावा व आम्ही सारे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर महोत्सव रविवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर होणार आहे अशी माहिती दत्त

कारखान्याचे संचालक व सोशल फाउंडेशनचे सचिव शेखर पाटील यांनी पत्रकारांना दिली.

शिरोळ तालुक्यातील लोककलाकारांना विविध कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत लोककलेचे संवर्धन व्हावे याकरता आम्ही सारे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय निमंत्रित कलाकारांमध्ये कलगीतुरा भेदिक गोंधळ

जागरण लावणी धनगरी ढोल वादन ओव्या गायन शाहिरी सोंगी भजन करून हलगी वादन गजानन भारुड या सह पारंपारिक लोक त्याला सादर होणार आहे.

महोत्सवातील सहभागी कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे यावेळी कलाकारांच्या विविध मागण्याबाबत प्रशासनास निवेदन देण्यात येणार आहे.

या महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दत्त

साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील हे भूषविणार आहेत.तेव्हा या महोत्सवानिमित्त होणाऱ्या कलाकार मेळाव्यास लोककला महोत्सवासाठी कलाकार व कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घ्यावा असे आवाहन

शेखर पाटील यांनी केले.यावेळी उद्योगपती अशोकराव कोळेकर,मुसा डांगे,राजेंद्र प्रधान,डॉ.दगडू माने,प्रदीप ऊर्फ बाळासाहेब बनगे,अरुण पाटील,बाळासाहेब गावडे, चंद्रशेखर कलगी,संजय सुतार,चंद्रकांत भाट आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!