पुलाची शिरोली येथे महाडिक कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

Spread the love

नऊ वर्षानंतरची जिल्हा परिषद निवडणूक मतदारांमध्ये उत्सुकता पुलाची शिरोली महाडिक कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क; वृद्धांची जिद्द अन प्रशासकीय शांततेच्या जोरावर ७६ टक्के मतदान झाले .

 

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली पुलाची येथील यादववाडी परिसरातील ज्ञानदीप विद्यालयात आज उत्साही वातावरणात मतदान पार पडले. कोल्हापूरच्या राजकीय पटलावरील प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या महाडिक कुटुंबाने येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच शिरोली पुलाची जिल्हा परिषद मतदार संघात सर्व बुथवर सायंकाळपर्यंत शांततेत मतदान पार पडले . सौ शौमिका महाडिक यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांशी आपुलकीचा संवाद साधला . ९५ वर्षीय सोनाबाई साताप्पा पाटील यानी मतदानाचा हक्क बजावला तर मतदार संघात ७६ टक्के मतदान झाले .शिरोली जिल्हा परिषद, पंचायत समिती व नागाव पंचायत समितीच्या या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांच्या केंद्रावर रांगा लागल्या होत्या यावेळी सकाळी ज्ञानदीप विद्यालयातील मतदान केंद्रावर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शोमिका महाडिक यांनी उपस्थित राहून मतदान केले यावेळी सौ शोमिका महाडिक यानी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्याना दोन दिवसांत शिरोली ग्रामपंचायतीकडून आपल्या सोयीबाबत व्यवस्थित काळजी घेतली का वेळेवर चहा , नाष्टा, जेवण मिळाले का असे विचारताच अधिकारी भारावून जात आजवरच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अशी सोय कोणत्याच ठिकाणी झाली नाही आंघोळी पासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टी वेळेवर मिळाल्या असे अधिकार्यानी सांगितले . यावेळी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन ही महाडिक यानी केले .या मतदानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका ९५ वर्षीय वयोवृद्ध महिला सोनाबाई साताप्पा पाटील यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे चालणे शक्य नसतानाही, इतरांच्या मदतीने खुर्चीवरून येत जिद्दीने कन्या शाळा क्रमांक १ या मतदान केंद्रावर येवून लोकशाहीवरील निष्ठेपोटी आपला मतदानाचा हक्क बजावला उपस्थित सर्वांनीच त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान केंद्रावर झालेले मतदान ७६ टक्के झाले .निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

Leave a Comment

error: Content is protected !!