अर्जुनवाड / प्रतिनिधी
अर्जुनवाड येथील समाजसेवक शिवाजी म्हैशाळे व त्यांच्या कुटुंबाची सामाजिक आणि धार्मिक कार्यातील सक्रियता गावात कायमच विशेष चर्चेचा विषय राहिली आहे.या कुटुंबीयांच्या नेतृत्वाखाली अर्जुनवाड व आजूबाजूच्या परिसरातील विविध मंदिरांचे जिर्णोद्धार, धार्मिक समारंभ आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात.श्री सिद्धनाथ मंदिर, श्री गणपती मंदिर, श्री रेणुका मंदिर, श्री अर्जुनेश्वर मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री दुर्गा माता मंदिर, श्री बिरोबा मंदिर यासह गावातील स्वागत कमान आणि वार्षिक वारकरी दिंडीमध्ये म्हैशाळे कुटुंबीय नेहमीच निस्वार्थी सेवा देत असतात.त्यांच्या या सामाजिक – धार्मिक योगदानामुळे अर्जुनवाडसह परिसरातील रहिवाशांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केली आहे.म्हैशाळे कुटुंबाची धार्मिक व सामाजिक कार्यातील भक्कम साथ मताच्या रूपाने सीमा म्हैशाळे यांच्या पाठीशी नक्की राहणार आहे. समाजाचे काहीतरी देणे हा त्यांचा नेहमीचा उदात्त हेतू राहिला आहे,त्यामुळे त्यांचा सहभाग प्रत्येक उपक्रमात अग्रेसर दिसतो. याच पार्श्वभूमीवर अर्जुनवाड,चिंचवाड,घालवाड, कुटवाड, कनवाड व हसुर गावांमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार अमोल चव्हाण व अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सीमा म्हैशाळे यांना मतदारांचा उत्साही पाठिंबा मिळत आहे. शिवाजी म्हैशाळे व त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक कार्यामुळे स्थानिक रहिवासी धार्मिक,सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत राहतात.त्यांच्या या निस्वार्थी सेवेमुळे गावकऱ्यांमध्ये एकजुटीची भावना वृद्धिंगत झाली आहे,तर सार्वजनिक प्रकल्प आणि सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याला मदत झाली आहे. गावकऱ्यांमध्ये म्हैशाळे कुटुंबाबद्दल आदर आणि विश्वास असल्याने,आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या पाठिंब्यामुळे सीमा म्हैशाळे व इतर उमेदवारांना निश्चितपणे फायदा होणार असल्याचे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे. अर्जुनवाडसह आसपासच्या गावांमध्ये सामाजिक व धार्मिक कार्य या कुटुंबाच्या सहभागाशिवाय पूर्ण होत नाही असे ही पाटील यांनी शेवटी म्हटले आहे.