कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे.या वाहनामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून वाहतूक चालु असते.मागून जाणाऱ्या वाहनांच्या हॉर्नचा
आवाज ही ड्रायवर लोकांना जात नसतो.यामुळे अपघात होत आहेत.रात्री च्या वेळेत सुध्दा मोठ्या आवाजात गाण्यांमुळे नागरीकांची झोपमोड होऊन नाहक त्रास होत
आहे.यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी याबद्दल युवासेना शिरोळ तालुका यांच्या वतीने कुरुंदवाड पोलिस स्टेशनचे सागर पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रतिक धनवडे, तालुकाप्रमुख निलेश तवंदकर,चिटणीस मंगेश पाटील,सनी माने,शहरप्रमुख दिग्वीजय चव्हाण,मिलींद गोरे,अमित कदम,संतोष नरके,स्वप्निल चव्हाण,सुनिल खराडे,अनिल चव्हाण,नजिर बेपारी व शिवसैनिक उपस्थितीत होते.