गांधीनगर नगर येथील तरूण मादळे येथे मृत्यावस्थेत… अपघात की घातपात…उलट सुलट चर्चा 

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे    

थर्डी फर्स्टची मजा लुटण्यासाठी आलेल्या गांधीनगर येथील तरूणाचा मादळे ता. करवीर येथे मृत्यू झाला. हा मृत्यू अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात असून या बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव रोहित हिरालाल निरंकारी वय ३७ रा. गांधीनगर असे आहे.  या बाबतची पोलिसांनी दिलेली माहिती मादळे या. करवीर येथील एका फार्म हाऊसवर रोहित हा आपला मित्र निखिल मोहन चावला याच्या सोबत त्याने नवीन घेतलेल्या ज्युपिटर मोपेड वरून बुधवारी आला होता.. त्याने त्या फार्म हाऊसवर भरपूर प्रमाणात मद्यपान करून ते गांधीनगर कडे जाताना बाळासाहेब पाटील यांच्या घराजवळ रोहित पडला. त्याला उठवण्यासाठी निखिल ने प्रयत्न केला पण तो काही उठला नाही.. दरम्यान रात्री उशिरा भजन करून मादळे येथील घरी परतणाऱ्या महिला भजनी मंडळातील महिला व पुरुष लोकांनी हा प्रकार पाहिला त्यातील पुरुष लोकांनी त्याला उठवण्यासाठी प्रयत्न केले. पण तो काही उठला नाही. मित्र निखिल हा परत फार्म हाऊसवर जाऊन झोपला.. सकाळी शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यास कोल्हापूर येथील सिपीआर रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले…. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. तपास सपोनि सरवदे करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!