मानसिक त्रासाला कंटाळून व्हॉटसअप अॅपवर स्टेटस ठेवत आत्महत्या

Spread the love

जमिनीच्या वादातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून व्हॉटसअप अॅपवर स्टेटस ठेवत पत्नीस फोन करुन “मला माफ कर, मी विषारी औषध प्यालो असे सांगून शिये येथे आत्महत्या , पाचजणांनवर गुन्हा दाखल

 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

 

जमिनीच्या वादातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून व्हॉटसअप अॅपवर स्टेटस ठेवत पत्नीस फोन करुन “मला माफ कर, मी विषारी औषध प्यालो असे सांगून शिये येथील बाबासो मधुकर इंगवले यानी २५ डिसेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती त्यानुसार पत्नी दिपाली बाबासो इंगवले यानी शिरोली पोलिसात पाचजना विरोध तक्रार दाखल केली आहे .

 

पोलिसातून मिळालेली अदिक माहिती अशी कि मयत बाबासो मधुकर इंगवले व आरोपी प्रल्हाद विलास इंगवले, रमेश विलास इंगवले, अमोल संजय इंगवले, शिवाजी बाबुराव इंगवले, धनाजी बाबुराव इंगवले हे भाऊबंद असून मयत बाबासो इंगवले व आरोपी यांच्या शेत जमीनीच्या हिस्साबाबत पेठवडगाव येथील दिवाणी कोर्टात दावा चालू आहे. सन २०२३ ते दिनांक २४/१२/२०२५ रोजी शिये या ठिकाणी बाबासो इंगवले यानी आपल्या वाटणीची जमीनी नागपुर रत्नागिरी महामार्गा करीता शासनास दिलेल्या जमीनीची आलेली रक्कमबाबत आरोपी प्रल्हाद विलास इंगवले, रमेश विलास इंगवले, अमोल संजय इंगवले, शिवाजी बाबुराव इंगवले, धनाजी बाबुराव इंगवले यानी सही न देता त्यामध्ये हिस्सा मागत असल्याने बाबासो इंगवले हे शिवाजी इंगवले व धनाजी इंगवले यांना भेटून दिवाणी कोर्टातील दावा मागे घेतो, जमीनीचे आलेल्या पैसा व जमीन वाटुन देणेबाबत समजावुन सांगून शेत जमीनीचा हिस्सा रजिस्टर वाटणीने द्या असे सांगत असताना या पाचजणांनी याबाबत चालढकल केली व बाबासो इंगवले याना वेळोवेळी मानसिक त्रास दिला.

 

प्रल्हाद विलास इंगवले, रमेश विलास इंगवले, अमोल संजय इंगवले, शिवाजी बाबुराव इंगवले, धनाजी बाबुराव इंगवले यांनी दिपाली व बाबासो इंगवले यांना कोर्टातील केस मागे घेतो व सहि देणेबाबत केलेला प्रस्ताव मान्य नाही असे म्हटल्यावर बाबासो इंगवले यांनी मी तुमच्या दारात येऊन माझ्या कुटूंबासह जिव देतो असे बोलल्यावर शिवाजी व धनाजी यांनी असे धमकी देणारे मी रोज बघतोय असे बोलल्याने बाबासो इंगवले यांना सहन झाले नाही. व ते घरी शिये येथे आलेवर विचार करत रात्रभर जागेच राहीले व दि.२५/१२/२०२५ रोजी सकाळी ११.२५ वा.चे सुमारास पत्नी दिपाली यांना फोन करुन “मला माफ कर, मी विषारी औषध प्यालो असे सांगितले व त्यांच्या मोबाईलमध्ये मला प्रल्हाद विलास इंगवले, रमेश विलास इंगवले, अमोल संजय इंगवले, शिवाजी बाबुराव इंगवले, धनाजी बाबुराव इंगवले यांच्या त्रासाला वैतागुन आत्महत्या करत आहे असा व्हॉटसअप अॅपवर स्टेटस ठेवला होता . दिपाली यानी पती बाबासो इंगवले याना औषधोपचारासाठी २५/१२/२०२५ रोजी कोल्हापूर येथील सुर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लक्ष्मीपुरी येथे अॅडमीट केले असता २६/१२/२०२५ रोजी पहाटे ०५.३० वाजण्यासुमार बाबासो इंगवले मयत झाले . प्रल्हाद विलास इंगवले, रमेश विलास इंगवले, अमोल संजय इंगवले, शिवाजी बाबुराव इंगवले, धनाजी बाबुराव इंगवले यानी आपल्या पतीला दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी दिपाली बाबासो इंगवले यानी शिरोली पोलिसात तक्रार दिली आहे . याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत

Leave a Comment

error: Content is protected !!