पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरात शिरून झोपलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला तर पाळीव कुत्र्याना गुंगीचा खाऊ घालून चोरट्यांनी सुमारे सव्वा तिन लाखांचे सोने,चांदी दागिने व रोख रक्कम लंपास केले ही घटना आज गुरूवार दिनांक 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री दिड वाजण्यासुमारास टोप येथे घडली.शिरोली पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी करत श्वानपथक व ठसे तज्ज्ञास पाचारण करण्यात आले होते.अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिस त्या आधारे शोध घेत आहेत.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कि महामार्गालगत असणार्या टोप ग्रामपंचायत शेजारी फिर्यादी वैभव पाटील यांचे घर असून ते आपल्या कुटुंबासह येथे राहतात बुधवारी रात्री घरातील सर्व कामे उरकून ते १० वाजण्यासुमारास झोपले,पण गुरुवारी मध्यरात्री दिड वाजता अज्ञात चोरट्यानी घराशेजारील पाहणी करत बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा उचकटुन घरात प्रवेश केला.घरात झोपेत असलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला.कपाटाची सोने,चांदीचे दागिने, मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असे एकूण सव्वातीन लाखाचा ऐवज लंपास केला यामध्ये १६ ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार किंमत १ लाख ४१ हजार ५४४, तसेच ४९,७५०किमतीची सोन्याची ठुशी सुमारे ५०, ००० रुपये किमतीची दोन चांदीची कडी , ५०००० रुपये किमतीचे तीन Vivo कंपनीचे मोबाईल हँडसेट व रोख रक्कम ३०,००० असा समावेश आहे.वैभव पाटील यांचे आजोबा घरामागे असणार्या शेडमध्ये झोपण्यास असतात ते लघुशंकेस उठले असता त्याना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यानी घरातील लोकाना आवाज दिला पण कोणताच प्रतिसाद आला असल्याने त्यानी घरात जाऊन वैभव यांस झोपेतून जागे केले त्यानंतर घरातील कपाट पाहीले असता त्या कपाटातील वस्तू विखुरलेल्या दिसल्याने घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.त्यानंतर त्यानी आपले पाळीव दोन कुत्र्याना पाहीले असता ते काहीतरी खाल्ल्यामुळे निपचित पडल्याचे दिसले त्यानंतर त्यानी शिरोली पोलिसांशी संपर्क साधून घडला प्रकार सांगितला त्यानंतर अज्ञात चोरट्यां विरोध्दात गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञ पथकास पाचारण केले.मात्र तपासात काही निष्पन्न झाले नाही. अधिक तपास शिरोली पोलीस करत आहेत.