श्रीमती शांता कृष्णा पाटील यांचे निधन 

Spread the love

 सैनिक टाकळी / प्रतिनिधी 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बेळगाव- कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ सीमा भागाचे नेते स्व. के.पी.पाटील (कृष्णा पाटील) यांच्या पत्नी तसेच आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्या मातोश्री श्रीमती शांता कृष्णा पाटील यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सामाजिक व कौटुंबिक जीवनात त्या प्रेमळ व कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जात होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधवार,दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता स्मशानभूमी,सैनिक टाकळी येथे होणार आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Comment

error: Content is protected !!