शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चारमधून ताराराणी आघाडीच्या शारदा सुनील माने यांच्या उमेदवारीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मतदार सातत्याने व्यक्त करत आहेत.विशेषतः महिला मतदारांकडून शारदा माने यांना जोरदार पाठींबा मिळत असून, त्यांच्या समस्यांना सक्षमपणे आवाज देण्यासाठी योग्य पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. प्रभागात अनेक वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन,शुद्ध पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था,नाल्या व स्वच्छतेचे प्रश्न असे मूलभूत विषय प्रलंबित असल्याने नागरिक त्रस्त आहेत.रोजच्या जगण्यात या अडचणींना सामोरे जात असताना त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचले नाहीत,अशी व्यापक भावना मतदारांमध्ये आहे. त्यामुळे या समस्या समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याची क्षमता शारदा माने यांच्यात असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.महिला मतदारांनी तर विशेषतः एकमुखाने शारदा माने यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे.घरगुती पाण्याचा तुटवडा, परिसरातील अस्वच्छता,कचरा उठाव न होणे या प्रश्नांनी हैराण झालेल्या महिलांना त्यांच्या मुद्द्यांसाठी लढणारे नेतृत्व हवे आहे.दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्यांना सामोरे जाताना आमच्या वेदना आणि अडचणी समजून घेणारी व्यक्ती नेतृत्वात असणे महत्त्वाचे आहे असे मत युवा वर्गापासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत अनेकांनी व्यक्त केले.युवक वर्गानेही प्रभागातील विकासाला नवीन दिशा देण्यास शारदा माने पूरक ठरतील, असे मत मांडले आहे.परिसराचा सर्वांगीण विकास आणि मूलभूत सुविधांची उभारणी हेच आजचे खरे प्राधान्य आहे असे युवांनी सांगितले.दरम्यान, शारदा सुनील माने यांच्या प्रचार उपक्रमांना नागरिकांची उत्स्फूर्त साथ लाभत असून,प्रत्येक भेटीत त्यांच्याबद्दलचा सकारात्मक प्रतिसाद वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमध्ये त्यांची उमेदवारी मजबूत होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.