कुंभोज जिल्हा परिषदसाठी सौ.अलका रविंद्र कागवाडे नाव आघाडीवर

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी 

कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून सौ.अलका रविंद्र कागवाडे (कुंभोज) यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.रविंद्र कागवाडे हे या मतदारसंघात प्रस्थापित कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखले जातात.त्यांनी दीर्घकाळ जनसंपर्काचे जाळे मजबूत केले असून समाजातील सर्व घटकांशी सुसंवाद राखल्याने मतदारसंघात त्यांची प्रतिमा विश्वासार्ह आणि जनतेच्या जवळची बनली आहे.सौ.अलका कागवाडे या स्वच्छ चरित्र्य,विनम्र स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वामुळे मतदारसंघात आघाडीवर असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कागवाडे दांपत्य सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय असून विविध विकासकामांमध्ये त्यांनी केलेला सहभाग उल्लेखनीय आहे. या कार्यामुळे मतदारसंघातील लोकांमध्ये त्यांच्या बद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे.महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येही सौ. अलका कागवाडे यांचे नाव जाहीर झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. “कागवाडे दांपत्याने आजवर पक्षनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जपली असून विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मतदारसंघात भरीव बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.कुंभोज परिसरात रविंद्र कागवाडे यांचे सर्व स्तरातील लोकांशी असलेले सुसंवादाचे संबंध, विकासकामातील पारदर्शकता आणि सामाजिक कार्यातील सातत्य यांचा फायदा या निवडणुकीत निश्चितच मिळेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.त्यामुळे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सौ. अलका रविंद्र कागवाडे यांचे नाव प्रबळ चर्चेत असून येत्या काही दिवसांत त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”

Leave a Comment

error: Content is protected !!