पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोलीतील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेची इमारत व प्ले ग्राऊंडच्या मोजणीचा अहवाल (रिपोर्ट) मिळावा.अशी मागणी ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद, बांधकाम उपविभाग हातकणंगले यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.बांधकाम उपविभागाकडून सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या इमारत व प्ले ग्राऊंडची मोजणी मागील महिन्यात(सप्टेंबर)झालेली होती, परंतु अद्याप शिरोली ग्रामपंचायतीकडे मोजणीचा अहवाल (रिपोर्ट)आला नसल्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले.या शाळेचा फाळा (कर) याबाबत रामचंद्र तुकाराम बुडकर यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी ठिकाणी तक्रार दाखल केली होती.तसेच याबाबतची तक्रार शिरोली ग्रामपंचायतीकडे सन २०२२ मध्ये केलेली होती. सन २०२३ च्या ग्रामसभेला विषय घेऊन विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी “आधी फाळा सिम्बॉलिकचा मगच आमचा” अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर परिणाम झाला आहे. सध्या करा बाबतचे शाळेचे प्रकरण खुपच संवेदनशील झाले आहे.यावेळी तक्रारदार रामचंद्र बुडकर, प्रशांत कागले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.