शरद इन्स्टिट्युटमध्ये १५ व १६ डिसेंबर आंतरराष्ट्रीय परिषद दोन दिवस परिषद : ‘अॅडव्हान्स कॉम्प्युटींग’ विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन

Spread the love

यड्राव / प्रतिनिधी

यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग या विषयावर परिषद (कॉन्फरन्स) होणाऱ आहे. डिसेंबरच्या १५ व १६ ला हि परिषद असून

डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉनॉजीकल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.व्ही. काळे व वारंगळ (हैद्राबाद) येथील एस.आर. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिपक गर्ग प्रमुख

उपस्थीत राहणार आहेत.परिषदेसाठी अॅडव्हान्सेस इन ए.आय., अॅडव्हान्सेस इन मशिन लर्निंग-डिप लर्निंग, अॅपलिकेशन ऑफ ए.आय. इन इंटर डिसप्लिनरी एरिया, रि इन्फोर्समेंट लर्निंग, अॅडव्हान्सेस इन डेटा

सायन्स या विषयावर देश-विदेशातून शोधनिबंध येणार असून त्याचे सादरीकरण येथे होणार आहे. स्विकारलेले शोधनिबंध स्प्रिजंर बुक सिरिजमध्ये प्रकाशित होणार आहेत. तसेच निवडक शोधनिबंध एस.एन. कॉम्प्युटर

सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहेत.या परिषदेमध्ये डॉ. मीना झा (ऑस्ट्रीलिया), डॉ. सागाया अमलाथास (मलेशिया), डॉ. भारत रावळ (यु.एस.ए.), डॉ. उमेश राव (यु.एस.ए.), डॉ. केतन कोटेचा, डॉ. अभ्यंकर हे उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच डॉ. जग्गनाथ सारंगपाणी, डॉ. अजय गुप्ता, डॉ. पी.एन. सुगांथान, डॉ. अमर अल्मोमनी, डॉ. विशाल शर्मा, डॉ. बलास वॅलेन्टीना इमिला, डॉ. अॅना मारिया हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.परिषदेत उदघाटन, परिषद पूर्व कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन, ऑनलाईन

सेशन, संशोधन पेपर सादरीकरण आदी कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व प्राध्यापक सहभागी होणार आहेत.संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली हि परिषद होत आहे.

error: Content is protected !!