हातकणंगले / प्रतिनीधी
ज्ञानदानाचा वसा घेतलेल्या शिक्षकांनी निवृत्ती नंतरही सेवा योगदान देणे गरजेचे आहे.सेवा निवृत्ती हि एक औपचारीकता असते असे प्रतिपादन आमदार डॉ अशोकराव माने यांनी केले ते आळते ता . हातकणंगले येथे आयोजित नरंदे विद्यामंदीरचे मुख्याद्यापक सुकूमार पांडव यांच्या सेवानिवृत्ती निमीत्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की , शिक्षक हा समाजाला दिशा देण्याचे काम करत असुन देशाचे भविष्य घडवण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात असेही ते म्हणाले .
नरंदे विद्यामंदीर चे मुख्याद्यापक म्हणुन काम करताना सुकूमार पांडव यांनी आदर्श विद्यार्थी घडवण्याबरोबरच सामाजिक बांधीलकीही जपली आहे , परस्तीतीशी संघर्षाची असतानाही आपल्या तत्वाशी कधीच तडजोड केली नाही त्यामुळे छत्तीस वर्षांच्या सेवेनंतर चा वेळ ही त्यांनी सेवा योगदानासाठी द्यावा असे आवहान ही आम .माने यांनी यावेळी केले.यावेळी माजी जि प सदस्य अरूणराव इंगवले , सरपंच अजिंक्य इंगवले, अर्जुन पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केला .मान्यवरांच्या हस्ते पांडव दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास सरपंच पुजा कुरणे , अभिजीत भंडारी , शितल हावळे , संजय कुंभार , शितल हरोले , गुंडू पाटील , संतोषी पांडव , कविता पांडव , फैय्याज मुजावर , संतोष कांबळे , अंकुश कांबळे उपस्थित होते .