पुलाची शिरोली गावच्या विकासासाठी कटिबध्द – सरपंच सौ.पद्मजा करपे

Spread the love

शासकीय निधी (वित्त आयोग), ग्रामपंचायत निधी व लोकसहभागातून तीन वर्षात सुमारे सात कोटी ४२ लाख रुपयांचा निधी गावाच्या विकास कामासाठी मार्गी लागत आहे.तर सुमारे साडेदहा कोटींचा प्रस्तावित विकामांचा निधी मंजूर प्रक्रियेत आहे. त्यामुळे पुलाची शिरोली गावाचा चेहरा मोहरा बदलून दर्जेदार विकासासाठी कटिबध्द आहोत.असा ठाम विश्वास सरपंच सौ. पद्मजा करपे व उपसरपंच बाजीराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

जिल्ह्यातील अग्रगण्य ग्रामपंचायती पैकी पुलाची शिरोली ग्रामपंचायतीची विशेष ओळख आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमुळे गावाचे नाव सातासमुद्रा पार जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे.औद्योगिक वसाहतीत कामाच्या निमित्ताने संपूर्ण देशातील विविध भागातून आलेले नागरिक येथेच स्थायिक झाले आहेत.त्यामुळे शिरोलीचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे पसरला आहे.तसेच गाव नव्हे तर एक विकसीत नगर म्हणून पुलाची शिरोलीची ओळख निर्माण झाली आहे.

 

 

पुणे बंगलूर राष्ट्रीय महामार्ग व औद्योगिक वसाहतीमुळे शिरोली परिसरात ट्रान्सपोर्ट व्यवसाय, हॉटेल,गोडावून, देश-विदेशी बनावटीचे कार,ट्रँक्टर व दूचाकी शोरुम्स, मार्बल हब असे लहान मोठे व्यवसाय सुरू आहेत. शिरोलीची लोकसंख्या ग्रामपंचायतीच्या दप्तरी ३१ हजार, मतदान २१ हजार इतके नोंद आहे. तर प्रत्यक्षात सुमारे साठ हजार हून अधिक लोकसंख्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

गावाच्या विकासासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक,खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासकीय निधी आणून शिरोली गावाचा सर्वांगिण विकासकामे पुर्ण करण्याचा प्रयत्न सर्व सदस्य करीत आहेत. तसेच ग्रामपंचायत अधिकारी सौ.गीता कोळी यांचा प्रशासनामधील असणारा कामांचा अनुभव यामुळेही गावात शासनाच्या विविध योजना राबविण्यास मदत होत असल्याचेही सरपंच करपे यांनी सांगितले.

 

 

गेल्या वर्षी पासून सरपंच आपल्या दारी हा उपक्रम तसेच स्मार्ट अंगणवाडी व महिला सक्षमीकरणासाठी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण. तसेच महिलांच्या संगणक साक्षरतेसाठी ग्रामपंचायतच्या वतीने महिला शिबिर व महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सरपंच सौ.करपे व उपसरपंच पाटील यांनी सांगितले. गावामध्ये १५ वा वित्त आयोग व केंद्र आणि राज्य सरकारच्या भरीव निधीतून शिरोली गावामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागत आहेत.

 

 

यामध्ये काँक्रीट रस्ते, आरसीसी गटार बांधकाम, शाळा इमारत बांधकाम, संरक्षक भिंती,ई लर्निंग सेवा ,स्मशानभूमी शेड बांधकाम,जॅकवेल जागा,सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,महिलांना प्रशिक्षण शिबीर,विद्युत पोल, दिवाबत्ती, हायमाँस्ट दिवे, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी, ट्रेलर,दफनभूमी, दलित वस्ती सुधार योजना, पेव्हींग ब्लॉक अशी अनेक कामे या निधीतून मार्गी लागत आहेत. तत्कालीन लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांनी मागील पाच वर्षांमध्ये शिरोली गावात शासनाच्या अनेक योजना पूर्णत्वास नेऊन विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यांच्या पुढाकाराने शिरोलीतील हनुमान मंदिराचे भव्य दिव्य बांधकाम पूर्ण होवून गावाच्या वैभवात भर टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे.

 

 

 

कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील व आमदार राजूबाबा आवळे यांच्या निधीतूनही पुलाची शिरोलीत विकास कामे मार्गी लावण्यासाठी यांनी विशेष प्रयत्न केले होते.एकूणच पुलाची शिरोलीत सत्ताधारी गावाच्या विकासासाठी आप – आपल्या प्रयत्नातून शासकीय निधी आणून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.
यामध्ये प्रामुख्याने पेठ वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती डॉ.सौ. सोनाली पाटील,माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सतीश पाटील,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष राजेश पाटील, राजाराम कारखाना संचालक दिलीप पाटील, शिरोली विकास सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी पाटील,उद्योजक सलीम महात, डॉ. सुभाष पाटील,संजय पाटील,उदय पाटील, माजी ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब कांबळे यांनी विविध क्षेत्राच्या माध्यमातून आपापल्या परीने गावाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

error: Content is protected !!