पंचगंगा नदीला बॅकवॉटरने पाणी द्या – शहाजी गावडे

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या काही दिवसांपासून घट झाली आहे.त्यामुळे नदीचे पाणी पातळ उतरण्यामुळे नदीपात्र कोरडे पडले आहेत.विशेषत: शिरोळ बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीतील पाणी अगदी कमी झाले असून पूर्णपणे नदी कोरडी झाली आहे.यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.शिरोळ,धरणगुत्ती,कुरुंदवाड,नांदणी, जांभळी, तेरवाड, शिरढोण, अब्दुल लाट, टाकवडे आदी गावांना पंचगंगा नदीतून पिकांसाठी पाणी पुरवठा होतो,परंतु सद्य परिस्थितीत या नदीत पाणी कमी झाल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. पाणी नसल्याने शेती पीक करपून जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे राजापूर बंधाऱ्याला बर्गे घालून कृष्णा नदीचे पाणी बॅकवॉटरने पंचगंगा नदीत सोडावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे शिरोळ शहराध्यक्ष शहाजी गावडे यांनी आज दुपारी तीन वाजता बोलताना व्यक्त केली.पातळीमध्ये कमालीची घट होऊन हिप्परगी धरणाच्या बॅक वॉटरमधील पाणी फक्त तीन फूट इतके उंच होते. यामुळे जलस्रोत कमी झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पिकांना पाणी न मिळाल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. तर याबाबत कुरुंदवाड पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता पाणी सोडण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

error: Content is protected !!