शिरोळ / प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिरोळ तालुक्यातील पाच आता हायटेक ग्रामपंचायत इमारत उभारणार आहेत.यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरदवाड,गणेशवाडी,तेरवाड,टाकवडे,नवे दानवाड या पाच गावांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये असा १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.शिरदवाड,गणेशवाडी, तेरवाड,टाकवडे,नवे दानवाड या ठिकाणी लवकरच नवीन ग्रामपंचायतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.उदगाव, दानोळी,धरणगुत्ती,अब्दुललाट,यड्राव,नृसिंहवाडी,दत्तवाड,चिपरी, निमशिरगाव यासह अनेक गावांच्या ग्रामपंचायतींची कार्यालये प्रशस्त व मोठी आहेत.पूर्वी ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी शासनाच्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधकामाला सुरुवात होणार आहे.ग्रामपंचायत १८ लाखांचा निधी मिळत होता.सध्या वाढत्या महागाईमुळे १८ लाखांवरून २५ लाखांची तरतूद केली आहे.या नवीन बांधकामात सरपंच,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी कक्ष,स्वच्छतागृह,सभा हॉल,सभागृह, ऑफिस केबिन,डीटीपी ऑपरेटर कक्ष,दुकान गाळे ही कामे करण्यात येणार आहेत.शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, गणेशवाडी,तेरवाड,टाकवडे,नवे दानवाड या गावांतील ग्रामपंचायतीच्या इमारती जुन्या व जीर्ण झालेल्या आहेत.त्यामुळे मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेतून निधी मंजूर करून आणला आहे.या कामाला लवकर सुरुवात होणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.