शेतकऱ्यांनी तोडी नाकारल्या म्हणून मागचं 100 मिळाले : धनाजी चुडमुंगे
कोणतीही चळवळ लोकांच्या सहभागा शिवाय यशस्वी होऊ शकत नाही यावर्षीच ऊस दराचे आंदोलन सुद्धा याला अपवाद नाही यावर्षी शेतकऱ्यांनी अभूतपूर्व अशी एकजूट दाखवली म्हणून कारखान्यांना शेतकऱ्यांच्या मागणी पुढे नमावे लागले आणि मागचं 100 रुपये मिळाले हा शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.ते ऊस दराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या लढवय्या कार्यकर्त्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते.
सैनिक टाकळी ऊस उत्पादकांच्या कडून हा सत्कार सोहळा घेण्यात आला होता.विठ्ठल मंदिर समोर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी संभाजी पाटील होते.या सत्कार सोहळ्यात बोलताना ते पुढे म्हणाले कि गेले चार महिने आम्ही मिशन 3500 अंतर्गत लढा बांधावरचा हे शेतकरी जागृती अभियान तालुक्यातील प्रत्येक गावात राबवले आणि त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना जोपर्यंत मागचं मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडी घ्यायच्या नाहीत तसेच ज्यांना अडचण आहे.त्यांनी उसात पाणी सोडून आम्हाला साथ द्यावी असे आवाहन केले होते त्याचा परिणाम म्हणून यावर्षी आंदोलन यशस्वी झाले याचं सगळं श्रेय हे शेतकऱ्यांचे आहे संघटना फक्त निमित्त आहेत असंही त्यांनी सांगितले.सुरुवातीला आंदोलन अंकुश व स्वाभिमानी च्या लढाऊ कार्यकर्त्यांचा फेटे बांधून ऊस उत्पादकांनी यथोचित सत्कार केला.स्वागत राजेश पाटील यांनी तर सुधाकर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.दीपक पाटील कृष्णा देशमुख हलिंगळे,विनोद पाटील यांची भाषणे झाली.यावेळी राजू पाटील,स्वप्नील पाटील,रोहन पाटील, अजित पाटील,अरुण पाटील (सावकर),तातोबा शिरहट्टी ,बाळासो पाटील,तानाजी पाटील,अरुण पाटील व सैनिक टाकळीतील ऊस उत्पादक मोठया संख्येने उपस्थित होते.