गाळप सुरु करण्यापूर्वी उसाचा दर दैनिकातुन जाहीर करणे बंधनकारक असताना व 22/23 चे ठरलेला दुसरा हप्ता 100 रुपये न देताच कारखाना का सुरु केला याचा जाब विचारत संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात आत गव्हाणीत घुसून आज सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता कारखाना बंद पाडला.जवळपास दोन तास गव्हाणीत कार्यकर्ते बसून होते.शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आज दुपारी दत्त इंडिया साखर कारखाण्यावर जमा झाले होते.निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी समोर येईना म्हणून संतप्त झालेले कार्यकर्ते थेट गव्हाणीत गेले आणि कारखाना बंद केला.
गव्हाणीत कार्यकर्ते बसल्यामुळे गाळप ठप्प झाल्याने अधिकारी विनवण्या करू लागले दरम्यान पोलीस फौंज पण आली वादावादी जास्त होऊ लागल्याने पोलिसांनी मध्यस्ती करून दत्त इंडियाचे मालक धारू साहेब यांच्याशी चर्चा करून येत्या 22 तारखेला संघटने बरोबर चर्चा करून मार्ग काढतो असे आश्वासन दिल्याने कार्यकर्ते शांत होऊन बाहेर आले.यावेळी शिरोळ मधील राकेश जगदाळे, दिपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, दिलीप माने, अमोल माने, आनंदा पाटील,सुनील यादव, आनंदा माळी,संभाजी माने, प्रकाश गडकरी, एकनाथ माने हे आंदोलनात सहभागी होते.