संजय सुतार / विशेष
श्री दत्त कारखाना आणि दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून गणपतराव पाटील दादांनी केलेले काम शेती आणि शेतकऱ्यांना नव संजीवनी देणारे ठरले आहे. त्यांच्या या कार्याचा आणखी फायदा सर्व शेतकऱ्यांना होण्यासाठी त्यांना शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करून नव्या जोमाने काम करण्याची संधी दिली पाहिजे.२००१ ते २००४ या कालावधीत त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले.त्यानंतर २०१४ पासून सलग १० वर्षे त्यांनी कारखान्याचे चेअरमन म्हणून यशस्वीरित्या काम केले. स्व.सा.रे.पाटील साहेबांनी कारखान्याचा चेअरमन म्हणून केलेली कामगिरी तसेच त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा अखंडितपणे पुढे चालविण्याचा प्रयत्न दादा करीत आहेत.आज साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत केली आहे.शेतकरी आणि कामगार यांना केंद्रबिंदू मानून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कारखान्याच्या माध्यमातून १५० ते २०० टन ऊस उत्पादनाचे अभियान गतिमान करण्यात आले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी नवनवे तंत्रज्ञान आणि त्याची माहिती देण्यासाठी अनेक गावात शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे आणि मेळावे घेतले जात आहेत.एकरी २०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य ठेवून त्या दृष्टीने शेतकऱ्यांना दत्त कारखान्यामार्फत मार्गदर्शन केले जात आहे. यासंदर्भातील पुस्तिका शेतकऱ्यांसाठी तयार करून शेतकरी सभासदांना विनामूल्य देण्यात आली आहे. शेतकरी तसेच युवक-युवतींसाठी ऑनलाईन मार्गदर्शन, वेगवेगळ्या गावात शेतकरी मेळावे,चर्चासत्रे घेऊन शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी मोठे योगदान दिले जात आहे.दत्त कारखाना हा आज समाजकारण आणि शेती विकासासाठीचे आदर्शवत दत्त मॉडेल म्हणून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या केंद्रस्थानी येत आहे.ही आपल्या दृष्टीने गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे. दत्त कारखान्याने पुढाकार घेऊन राबविलेल्या क्षारपड जमीन सुधारणा आणि सेंद्रिय शेतीमधील प्रयोगाची दखल देशपातळीवर घेतली जात आहे.असेच प्रयोग अनेक राज्यात केंद्र सरकारच्या वतीने राबविले जात आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे.याचबरोबर बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळावे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत.रक्तदान शिबीर,विविध कार्यक्रम,शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा,कार्यक्रम,कोरोना महामारी काळात कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.गरीब गरजू रुग्णांना अत्यावश्यक सेवा इथे पुरवण्यात येत आहेत.
दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कमी खर्चाच्या शाश्वत ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत नामांकित शास्त्रज्ञ आणि शेती तज्ज्ञांचे चर्चासत्र कारखाना कार्यस्थळावर आयोजित केले होते.पूर परिस्थितीत आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान कसे टाळता येईल आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीने कोणते पीक घेता येईल,आधी विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.उसाला पर्यायी पीक देत येते का,शुगरबीट,पेरू, चिकू,आंबा आदींचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येते का याचा विचार केला जात आहे.तसे प्रयत्न आणि प्रयोग सुरू केले आहेत.शुगर बिटचा प्रयोग प्रत्यक्षात शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांना नवा दिलासा देण्याचा प्रयत्न आगामी काळात निश्चितच होणार आहे.जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी शेतकऱ्यांना कारखान्याच्याकडून मदत केली जाते.सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते.पान, माती,पाणी परीक्षण मोफत उपलब्ध करून दिले आहे. सेंद्रिय साखर आणि गूळ तसेच सेंद्रिय शेती उत्पादनाची बाजारपेठ दत्त कारखान्यावर सुरू करण्यात आली आहे. दत्त भांडारने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून आपुलकीची सेवा देत आहे.दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी होत असलेल्या कामाला तोड नाही.काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी दादा अहोरात्र काम करताना दिसत असतात. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जाण असलेला एक जागरूक नेता,शेती तज्ज्ञ,कृषीपंडित,मार्गदर्शक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपला वाटणारा ‘आपल्या हक्काचा’ शेतकरी माणूस जिल्हा बँकेत गेल्यास आपण हक्काने आपल्या विकासाची कामे करून घेऊ शकतो.आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे दादांना शिरोळ विधानसभेत निवडून देण्याची.आपल्या निःस्वार्थ कामाच्या जोरावर दादा निश्चित विजयी होणारच याची खात्री आहे.