गणपतराव पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे केले आवाहन
शिरोळ / प्रतिनिधी
भाजपाने देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली आहे.व्यक्तिगत सूड घेतल्यासारखे शेतकऱ्यांना वागवले जात आहे. रामायण काळापासून आत्तापर्यंत जातीजातीत वाटण्याचे, विभागण्याचे काम मनुवादी संस्कृतीने केले आहे. त्यांच्या विरोधात प्रथम आंदोलन हे राजर्षी शाहू महाराजांनी केले होते. ज्यांना गाईचे मूत प्यावे की दूध प्यावे हे कळत नाही, ते शेतकऱ्यांचे धोरण ठरवत आहेत. विरोधक हे अनेक प्रकारची भानामती करत असून तुम्ही त्याला बळी पडणार का? याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या मनुवाद्यांचा पहिला पराभव या कोल्हापूर जिल्ह्यातच झाला पाहिजे, यासाठी शपथ घ्या आणि गणपतराव पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकले यांनी केले.आलास येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी कृष्णात शेडबाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. महिलांनी औक्षण करून गणपतराव पाटील यांचे स्वागत केले. सभेच्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या,भाजपा कडून हिंदू धर्म खतरे में है असे म्हणून आम्हीच हिंदुत्वाचे रक्षण करणारे आहोत हे बिंबवले जात आहे. पण आमचे रक्षण कोणापासून आणि का करणार आहात? हे त्यांनी सांगावे. भाजपाचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. खोट्या भूलथापा अजूनही सुरूच आहेत. अशावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाला एकत्र करण्यासाठी 4500 किलोमीटरचा प्रवास केला. देशाला नवी ऊर्जा आणि चैतन्य दिले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने दिलेला जाहीरनामा प्रत्यक्षात आणला असून त्या संदर्भात अपप्रचार करणाऱ्यांनी कर्नाटकात येऊन प्रत्यक्षात पहावे. महाराष्ट्रात सुद्धा खटाखट खटाखट खटाखट सुरू करण्यासाठी, शेतकऱ्यांचा वारसा चालवणाऱ्या गणपतराव पाटील यांच्या एक नंबरला असणाऱ्या ‘हात’ या चिन्हावर एकच मत देऊन त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन केले.उमेदवार गणपतराव पाटील म्हणाले,शिरोळ तालुक्याचा तुमचा आमदार म्हणून मी काम करण्याची भूमिका घेऊन या निवडणुकीसाठी उभा आहे. आतापर्यंत मी केलेली विकास कामे सर्वांनाच माहीत असून लोकांच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, सहकार अशा कोणत्याही अडचणीमध्ये माझा दरवाजा कायमने उघडा राहील. त्या अडचणीमधून मार्ग काढण्याची माझी भूमिका ठामपणे राहील. वैयक्तिक जीवनासाठी माझी उमेदवारी नसून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याने मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे.प्रा. सुकुमार कांबळे, सांगोला किसान वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम, स्वाती सासणे, मिनाज जमादार, सतीश भंडारे, रफिक पटेल, उमेश पाटील, रूकैय्या केरुरे आदींनी आपल्या भावना व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याची आवाहन केले.छत्रपती राजर्षी शाहू विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष अमन हसीना फैय्याज पटेल यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. बाबुराव कांबळे यांनी बौद्ध समाजाचा पाठिंबा जाहीर केला.
स्वागत मुनाफ जमादार, प्रास्ताविक असलम मखमला तर सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले.यावेळी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी मंत्री साके शैलजानाथ, चंगेजखान पठाण, वैभव उगळे, पृथ्वीराजसिंह यादव, सर्जेराव पवार, भैय्यासाहेब पाटील, हसन देसाई, ऋषिकेश पाटील, हेमंत पाटील, शंकर राजमाने, चाँदपाशा पटेल, नासर पठाण, कृष्णा शेडबाळे, सुरेंद्र कांबळे, विश्राम कोळी, चंद्रकांत उपाध्ये, बापू बोरगावे, इरफान राजमाने, भाऊसो पवार, आप्पासो वाडीकर, रमण मोरे, संजय यादव, जवाहर कांबळे, सहदेव कांबळे, सरदार मखमला, भूपाल मगदूम, रमेश शिंदे, प्रकाश दानोळे, अनिरुद्ध कांबळे, आप्पासो राजमाने, पीरपाशा पाटील, प्रदीप धनवडे, दस्तगीर जमादार, मुनाफ जमादार, बाबासाहेब नदाफ, किरण भोसले, दिनेश कांबळे, सुरेश कांबळे, कु. बुशेरा खोंदू, गणेश पाखरे, वसंतराव देसाई, स्नेहा जगताप पाटील, अमन पटेल, जीवन बरगे, परवीन जमादार, सुजाता सूर्यवंशी, अक्काताई कोळी, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, चंद्रकला पाटील, अनंत धनवडे, संदीप बिरणगे, पद्माकर देशमुख, दत्तात्रय कदम, चंद्रकांत जाधव घुणकीकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.