गणपतराव पाटील दादांसारख्या चांगल्या व्यक्तीला निवडून देण्याचे केले आवाहन
शिरोळ / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे. भाजपाने काँग्रेसच्या पंचसूत्री जाहीरनाम्यावर टीका करून कर्नाटक राज्याला दिवाळीखोळीत काढण्याच्या या योजना आहेत अशी टीका केली होती.पण काँग्रेसने सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे. कर्नाटकच्या या योजनांची कॉपी करून महायुतीचे सरकार आता विविध योजना जाहीर करीत आहे.मग महायुतीने जाहीर केलेल्या या योजनांमुळे महाराष्ट्राचे दिवाळे निघत नाही का? असा सवाल कागवाडचे आमदार राजू कागे यांनी केला.जात-पात, हिंदू-मुस्लिम काहीही न पाहता एका चांगल्या व्यक्तीच्या मागे राहण्याची भूमिका ठेवलात तर तुमचे जीवन चांगले करू शकता.यासाठी गणपतराव पाटील दादांसारख्या चांगल्या व्यक्तीला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.गौरवाड येथे गावातून पदयात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी विविध ठिकाणी औक्षण करून गणपतराव पाटील यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.गणपतराव पाटील म्हणाले, देशाचा विकास करणे, सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाणे, आणि लोकांचे हित साधण्याची भूमिका घेऊन काँग्रेस पक्ष काम करतो. काँग्रेसच्या पंचसूत्री जाहिरनाम्याचा विचार करून तालुक्याच्या विकासासाठी मला निवडून द्या.स्वाभिमानीचे कार्यकर्ते सलाउद्दीन मुजावर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून कार्यकर्त्यां सोबत आपण काम करणार असल्याचे सांगितले.
सत्तार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभा घेण्यात आली. सुरेश गोरवाडे, बाबासाहेब नदाफ आदींनी मनोगत व्यक्त केले. श्री दत्त कारखाना संचालक विश्वनाथ माने, भैय्यासाहेब पाटील, बशीर कोल्हापूरे, नवाज कोल्हापूरे, भरत कांबळे, दाऊत चौगुले, आप्पासो सनबे, मल्लाप्पा धनगर, निलेश मळवाडे, मिथुन मळवाडे, बाळू हिप्परगे, बाबू पटेल, जीशान पटेल, नवीन पटेल, बाबूसो पटेल, संजय अनुसे, पद्माकर देशमुख, शिवराज पाटील, विजयकुमार चौगुले, गणेश पाखरे, शशिकला वाडीकर यांच्यासह मविआचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
कवठेगुलंद येथे पदयात्रा झाली.यावेळी महाराष्ट्र बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल माने यांच्यासह प्रकाश हुलस्वार सुरेश मालेकर, प्राचार्य प्रमोद हुपरीकर, महावीर लाटकर यांनी पाठिंब्याचे पत्र गणपतराव पाटील यांना दिले.मोहसीन वाळवेकर, राम तांबिरे, अविनाश कदम, सुरेश कांबळे, सरपंच संगीता शिंदे आणि आमदार राजू कागे यांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांच्या विकासात्मक दृष्टीच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.जगन्नाथ कदम, कृषी शिंदे सरकार, संदीप लाड, प्रमिला जगताप, शेखर कांबळे, रावसाहेब पाटील, अशोक पाटील, बंटी निंबाळकर, हेमंत आवटी, विकास कांबळे, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे कार्यकर्ते यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.