गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीची सत्ता आणा
देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या शिरोळ तालुकाध्यक्षा मिनाज जमादार यांचे मत
शिरोळ / प्रतिनिधी
मुस्लिमांना आरक्षण देणार नाही अशी भूमिका देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केली आहे.त्याचबरोबर महायुतीचे सरकार आल्यावर मस्जिदी वरील भोंगे खाली काढण्यात येतील अशी घोषणा निलेश राणे यांनी केले आहे.भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार धमकी वजा बोलणे सुरू आहे.त्यामुळे सर्व मुस्लिमांना आमचं काय? हा प्रश्न पडला आहे.संविधान बदलण्याची भाषा केली जात असून या देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिक,नि:स्वार्थी गणपतराव पाटील यांना निवडून देऊन महाविकास आघाडीची सत्ता आणा, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीच्या शिरोळ तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती माजी सभापती मिनाज जमादार यांनी केले.
औरवाड येथे प्रचंड मोठ्या पदयात्रेनंतर आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.शिरोळ तालुका संपर्कप्रमुख बाजीराव मालुसरे म्हणाले,औरवाड मध्ये सर्व जातीचे लोक एकत्र येऊन गणपतराव पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत ही गोष्ट सर्वात चांगली वाटते.यामुळे आपला विजय निश्चित झाला आहे.रात्र वैऱ्याची असून कोणत्याही आमिषाली बळी न पडता घोटाळेबाज लोकांकडून पैसे घेऊन आपले स्वच्छ चारित्र्याचे हात खराब करू नका.उमेदवार गणपतराव पाटील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वच ग्रामस्थ, मतदारांचे आभार मानून म्हणाले,गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या विकासाच्या चांगुलपणाची दृष्टीसमोर ठेवून मी आतापर्यंत काम केले असून यापूर्वी झालेल्या विकासात्मक कामाचा वारसा पुढे सुरू ठेवणार आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक समस्या व अडचणीवर काम करण्यासाठी तुमचा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या,सर्वांसाठी माझा दरवाजा कायमस्वरूपी उघडा राहील अशी मी ग्वाही देतो.युनुस पटेल यांनी शेरोशायरीतून गणपतराव पाटील यांच्या कामाचे कौतुक करून भाजपाच्या गुंडगिरी व तडीपाराचे सरकार हद्दपार करावे असे आवाहन केले.स्नेहा देसाई,राहुल काकडे,दिगंबर सकट,हसन देसाई,रामदास गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.वंचित बहुजन आघाडीचे इरफान करीम खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपली भूमिका स्पष्ट केली.
मुस्ताक पटेल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन साहिल कबीर यांनी केले तर आभार रफत पटेल यांनी मानले.यावेळी वैभव उगळे,आय.आय.पटेल, अश्रफ पटेल,एम.जी.पटेल,रिजवान पटेल,गफार चौगुले, हाजी लाजम जनाब गुरुजी,रमेश रावण,अरुण मंगसुळे, नबीसो पटेल,जमीर पटेल,जयवंत मंगसुळे,इकबाल चौगुले, जहूर गुरुजी, अश्रफअली पटेल, असमतपाशा पटेल, इस्तियाक पटेल, कादर पटेल, बाबासो कांबळे, अतिक पटेल, भैय्यासो पाटील, मंगलताई चव्हाण, स्वातीताई सासणे, रमेश शिंदे, वसंतराव देसाई, राजू आवळे, राजेंद्र प्रधान, सुरेश कांबळे, दिनेश कांबळे, किरण भोसले, अनंत धनवडे, परवीन जमादार, स्नेहा जगताप पाटील, सुजाता सूर्यवंशी, अक्काताई कोळी, रेखा पाटील, राजश्री मालवेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.