इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांनी मतदारांशी थेट-भेट,चाय पे चर्चा माध्यमातून संवाद, पदयात्रा, कॉर्नर सभा आदींच्या माध्यमातून सर्व भाग पिंजून काढत प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. आमदार प्रकाश आवाडे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचारात आघाडी घेतली आहे.जाईल त्याठिकाणी राहुल आवाडे यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यापासूनच त्यांनी इचलकरंजी शहरच नव्हे तर ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत संवाद साधत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व खर्चातून कुपनलिकांची दुरुस्ती करण्यासह ज्या-त्याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचबरोबर चाय पे चर्चा या उपक्रमातून सकाळपासूनच भागाभागात जात तेथील ज्येष्ठ,तरुण यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतानाच प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.तर आपण काय करणार याची माहिती देत आहेत.त्याचबरोबर राज्यातील महायुती सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कसा लाभ झाला आणि पुढेही होणार हे पटवून देत आहेत.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निरिक्षक निपाणीच्या आमदार सौ.शशिकला जोल्ले यांच्याही भागाभागात बैठका, सभांचा धडाका सुरु आहे.त्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने केलेली कामे,आवाडे यांनी केलेला मतदारसंघाचा विकास याची माहिती देत महायुतीचेच सरकार का हे पटवून दिले जात आहे.राहुल आवाडे यांच्या पाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांची भक्कम साथ असून हे दोन्ही दिग्गज आपला उमेदवार कसा विजयी होईल यासाठी रणनिती आखत आहेत.हाळवणकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनीही प्रचाराचे सुयोग्य नियोजन केले आहे.त्याचबरोबर सौ.मौश्मी आवाडे यांनीही प्रचारासाठी पुढाकार घेताना ग्रामीण भागात तसेच इचलकरंजीत भागाभागातील महिलांशी संवाद साधत आहेत.महायुती शासनाने महिलांनी आणलेल्या विविध योजनांची माहिती देत या योजना अखंडीत सुरु राहण्यासाठी महायुती सरकारला बळ देण्यासाठी राहुल आवाडे यांनी विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. त्यातून महिला वर्गाचे मोठे पाठबळ लाभत आहे.
एकूणच महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे.तर अखेरच्या टप्प्यात आमदार प्रकाश आवाडे यांची रणनिती काय असणार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे शिस्तबध्द नियोजन अन् महासभा कोणाच्या होणार याची उत्सुकता लागली आहे.