“भावनिक साद” जांभळी गावचे ऋण मी फेडू शकणार नाही – गणपतराव पाटील

 

शिरोळ/ प्रतिनिधी

जांभळी गावाने माझ्या कुटुंबावर भरभरून प्रेम केले आहे.सामाजिक,सहकार,राजकीय क्षेत्रात काम करताना सर्वांची प्रेरणा आणि आशीर्वाद मिळाले.त्यामुळेच माझ्या रूपाने जांभळी गावातील नेतृत्व पुढे आल्याचा आनंद गावकऱ्यांना झाला आहे.गावचे प्रेम आणि चांगुलपणाचे ऋण मी फेडू शकणार नाही.गावच्या मी ऋणातच राहू इच्छितो, अशी भावनिक साद गणपतराव पाटील यांनी गावकऱ्यांना घातली.तसेच शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी आपणास मतदान करावे असे आवाहन केले.जांभळी येथे मविआ उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा,रॅली नंतर झालेल्या विजय निश्चित मेळाव्यात ते बोलत होते.प्रारंभी सर्व ग्रामदैवतांचे पूजन करून स्व. सा.रे.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सरपंच सौ. अरुणा कोळी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.जयपाल कांबळे, कॉ.नारायण गायकवाड, खंडू खिलारे, राजू पाटील, दिलीप पाटील, के. आर. चव्हाण, स्वाती सासणे, विलास कांबळे, स्नेहलता देसाई, अमन पटेल, रवी पाटील यांनी गणपतराव पाटील यांनी केलेल्या कामाची माहिती देऊन आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले. आभार राजाराम कदम यांनी मानले.श्री दत्त कारखाना संचालक अनिलराव यादव, अमरसिंह यादव, महेंद्र बागे, शेखर पाटील, आण्णासाहेब पाटील, वैभव उगळे, रेखा पाटील, आशाताई वाडीकर, हसन देसाई, राजू आवळे, राजश्री मालवेकर, सुजाता सूर्यवंशी, रवी जाधव, प्रा. टी. एस. पाटील, , पांडुरंग रजपूत, मंगलाताई चव्हाण, वसंतराव देसाई, परवीन जमादार, स्नेहा जगताप, दत्तात्रय कदम, दिलीप पाटील कोथळीकर, रायगोंडा पाटील, सहदेव सूर्यवंशी, रमेश शिंदे, बाबासाहेब पाटील, राजगोंडा पाटील, राजाराम कदम, विनायक राऊत, आकाश पाटील, सुनिल राऊत, अनिल राऊत, सतीश भंडारे, दिनेश कांबळे, किरण भोसले, गणेश पाखरे, बसवराज कांबळे, पद्माकर देशमुख, विद्याधर ढोबळे, ऍड. अनिरुद्ध कांबळे, अनिल कुरणे, एन. एस. कांबळे, शशिकांत घाटगे, संदीप बिरणगे, सुनिल सूर्यवंशी, भानुदास मोरे, राजेंद्र प्रधान यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोंडीग्रे येथे आज झालेल्या पदयात्रेदरम्यान महिलांनी पुष्पवृष्टी व औक्षण करून गणपतराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. विविध मान्यवरांनी व गणपतराव पाटील यांनी मविआची भूमिका सांगून विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी सोमनाथ कुंभार, प्रदीप पेठारी, सुशांत भुजुगडे, दत्ता कुंभार, बबन भुजुगडे, महावीर मालगावे, किसन कांबळे, मनोहर यादव, बाबुराव मालगावे, बाळासो भुजुगडे, भूपाल कुंभार, प्रवीण कांबळे, विलास कांबळे, राजू बुरान, गौतम कांबळे, अशोक कुंभार, श्रीकांत कुंभार, पिंटू चव्हाण, काशिनाथ डोंगरे, दीपक सातपुते, सुरेखा कांबळे, प्रवीण कांबळे, विनोद भोसले, अविनाश कांबळे, जितेंद्र भुजुगडे, सुशांत भुजुगडे, सुरेश कांबळे, राजू कांबळे, प्रदीप कांबळे, विठ्ठल कोकरे, अविनाश भुजुगडे, रवी जाधव, प्राध्यापक टी. एस. पाटील, हसन देसाई, वैभव उगळे, राजू पाटील यांच्यासह महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!