लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकवण्यासाठी ‘माई‘ संघटना पुढाकार घेईल – शीतल करदेकर

कोल्हापूर / प्रतिनिधी

लोशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या लढवय्या पत्रकार शीतल करदेकर यांच्या नेतृत्वाखाली मिडीया असोशिएशन आँफ इंडिया (माई) सोबत राहून न्याय,हक्क आणि सन्मानासाठी एकजूट होऊन हात बळकट करूया असे

आवाहन राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.सुभाष सामंत यांनी केले.
ते हातकणंगले येथे आयोजित केलेल्या विभागीय बैठकीत बोलत होते.पुणे विभागाचे संघटन सचिव शेखर धोंगडे प्रमुख उपस्थित होते.

डॉ.सामंत म्हणाले की,”मिडीया असोशिएशन आँफ इंडिया”ही पत्रकारांचे राष्ट्रीय संघटना असून,१९२६ च्या कामगार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहे.शहरी व ग्रामीण वार्ताहरांना किमान वेतन कायदा,पत्रकारांना सुरक्षितता-सन्मान,पत्रकारांचे

रजिस्ट्रेशन(महामंडळ) व्हावे,या प्रमुख मागणीबरोबरच महिला पत्रकारांना समान वेतन व अधिकार,सुरक्षितता मिळावी यासाठी धाडसी,लढवय्या पत्रकार शीतल करदेकर या नेहमीच झगडत आल्या आहेत.या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या कामाला

बळकटी आली असून,गावोगावातून,शहरा शहरातून अनेक वार्ताहर,ज्येष्ठ पत्रकार या संघटनेशी जोडले जात आहेत.या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेत केवळ वार्ताहर, पत्रकार,सभासद नसून मालक,व्यवस्थापन,पत्रकारेतर

कर्मचारी,वितरक यांनाही सोबत घेऊन ही संघटना भविष्यात वाटचाल करणार आहे.चौथास्तंभ हा लोकशाहीचा आधार असून तो भविष्यात टिकला पाहिजे,त्याचा सन्मान वाढला पाहिजे हे प्रमुख धोरण असून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून माई ची वाटचाल राहणार असल्याचे सांगितले.

पुणे विभागाचे संघटन सचिव शेखर धोंगडे म्हणाले की, ही संघटना ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या ग्रामीण वार्ताहरला देखील साथ देणार असून,यामध्ये प्रिंट,वेब पोर्टल, यु ट्यूब,फोटोग्राफर,डेस्कचे पत्रकार,व्यवस्थापनमधील अधिकारी,कर्मचारी यांचाही समावेश मिडीया असोशिएशन आँफ

इंडियामध्ये असणार आहे.पत्रकारांवर होणारा अन्याय रोखणे हा प्रमुख भूमिका घेऊन वाटचाल करत आहोत,पत्रकारांना आर्थिक स्थैर्य देण्याचा एक प्रयत्न असणार आहे.समाजातील विविध समस्या सोडविणे, चांगल्या सामाजिक कामाला पाठिंबा देण्यासाठीही संघटना पुढाकार घेईल असे संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले.

यावेळी माईमध्ये सामील झालेल्या पत्रकांरांचे शीतल करदेकर यांनी व्हीडीओ कॉलिंगद्वारे संवाद साधत मार्गदर्शन करून
स्वागत केले.अन्य संघटना देखिल आपल्यासोबत संलग्न होऊन काम करू शकतात यासाठी आपले असोसिएशन तयार केल्याचे सांगितले.संघटना वाढविण्याबरोबरच नियोजनबद्ध राहून, कायद्याच्या चाकोरीत सर्वांनी काम करायचे आहे असाही सल्ला दिला.

स्वागत आणि प्रास्ताविक हातगणंगले तालुका अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी केले.पुढे म्हणाले की राष्ट्रीय अध्यक्षा शीतलताई करदेकर व डॉ.सुभाष सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २०२० पासून कार्यरत आहे.आम्हाला विश्वास आहे की पत्रकारांना सन्मान त्यांचे हक्क हीच संघटना मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी विनयकुमार पाटील,कुबेर हंकारे,रविकिरण बळे,निवास चौगले,मारुती गायकवाड,संतोष कांबळे,राजू खोंद्रे,राकेश गोरवाडे,प्रणव कुलकर्णी,अब्दुल नदाफ,मल्हारी सासणे,प्रशांत कांबळे,संतोष गोते,राजेंद्र पुजारी,रणजित देवणे,प्रतिक निंबाळकर,संदीप दाभाडे,सुरेश सुवासे,भारत जमणे आदी पत्रकार उपस्थित होते.आभार शिरोळ तालुकाध्यक्ष विनोद पाटील यांनी आभार मानले.

Spread the love
error: Content is protected !!