भूलथापांना बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या रूपाने चांगला उमेदवार निवडून देवूया – मधुकर पाटील

भूलथापांना बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या रूपाने चांगला उमेदवार निवडून देवूया

शिवसेना जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील यांचे कनवाड येथे आवाहन

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळचे आमदार सांगतात 2 हजार कोटींची कामे झाली. पण हा निधी कोठे गेला हा संशोधनाचा विषय झाला आहे. गावात आल्यावर लोकांचे प्रश्न आहेत तसेच राहिले असल्याचे दिसते. आमिष, भूलथापांना बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या रूपाने चांगला उमेदवार देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया, असे आवाहन शिवसेना जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील यांनी केले.
कनवाड येथे ते बोलत होते. मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ येथे पदयात्रा काढण्यात आली. तसेच जंबु चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभाही घेण्यात आली.
स्वाती सासणे यांनी गणपतराव पाटील यांना का निवडून द्यायचे याची भूमिका मांडताना राज्याची झालेली दुर्दशा नाहिशी करण्यासाठी दिशा देणारा उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले. गणपतराव पाटील, पृथ्वीराजसिंह यादव, राजेंद्र प्रधान, कविता चौगुले, स्नेहा देसाई, शुभम कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करून मताधिक्य देण्याची विनंती केली. अमन पटेल यांनी आभार मानले.यावेळी पोपट कुपाडे, रामगोंडा पाटील, आबासाहेब पाटील, गौस पटेल, महादेव बनकर, दादा गौराज, रेखाताई पाटील, राजश्री मालवेकर, सातगोंडा गौराज, मोतीलाल बारगीर, दादासाहेब गौराज, करीम इनामदार, गुडू पटेल, बाळासाहेब माळी, राजू आवळे, दिनेश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.कुटवाड येथे शुभम कांबळे यांनी स्वागत केले. शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे, मधुकर पाटील, रमेश शिंदे, पृथ्वीराजसिंह यादव, बाळासाहेब कोळी, कविता चौगुले, स्नेहा देसाई, स्वाती सासणे, तातोबा कोळी, अर्जुनवाड माजी सरपंच विकास पाटील, राजेंद्र प्रधान, अमन पटेल, कृष्णात पाटील, राजू आवळेबआदींनी गणपतराव पाटील यांना भरघोस मतांनी विधानसभेत पाठविण्याची विनंती केली.गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली.डी. सी. एम. ग्रुपने गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.राजगोंडा पाटील, शामराव पाटील, रामराव पाटील, सुरेश कांबळे, श्रीरंग पाटील, तानाजी पाटील, अमर पाटील, प्रतीक पाटील, अनिल पाटील, भाग्यश्री जाधव, संगीता कांबळे, सागर मगदूम, प्रकाश पाटील, राजू पाटील, वसंतराव देसाई, किरण भोसले, बाळासाहेब कांबळे, प्रभाकर मगदूम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अमोल पाटील यांनी आभार मानले.

Spread the love
error: Content is protected !!