भूमीपुत्राचा रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब टाकळीकर घेणार का?
शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे मागण्याऱ्यावर हल्ले करणारे आज मतासाठी हात जोडताना
शिरोळ / प्रतिनिधी
शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे साखर कारखानदाराच्या दारात बसून मागणाऱ्या सैनिक टाकळी येथील भुमीपुत्र दिपक पाटील याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार का ? असा प्रश्न शिरोळ तालुक्यातील चळवळीतील तरुण शेतकऱ्यातून विचारला जात आहे.
शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे मागणाऱ्या सैनिक टाकळी येथील भूमीपुत्रावर साखर कारखानदारांनी ६ नोव्हेंबर २०२२ साली दुपारी १ वाजता शिरोळ नृसिंहवाडी येथील शिरटी फाटा येथे हल्ला करून रक्तबंबाळ केलं होते. तरुण शेतकऱ्याचे आंदोलन चिरडून टाकून त्यांच्यावर ऊसाने भरलेली वाहने घालण्याच्या प्रयत्न झाला.हक्काचे पैसे मागणाऱ्या एक तरुण शेतकऱ्यावर हल्ला करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करत सैनिक टाकळीतील तरुणांनी पक्ष,जात,धर्म बाजूला करत गावच्या तरुणावर हल्ला होतो याच्या जाहीर निषेधार्थ फेरी देखील काढली,या घटनेला जरी आज दोन वर्षे झाली असली तरी टाकळीकरांची जखम अजून भरलेली नाही.आज आपल्या गावच्या तरुणावर हल्ला करणारे हेच साखर कारखानदार एसीची केबिन सोडुन आता भर उन्हात पांढऱ्या रंगाच्या शर्टाला घाम येई पर्यत मतासाठी खोपरापासून हात जोडत शेतकऱ्याच्या दारात येत प्रत्येक घरात येऊन हात जोडत पाया पडत.दोन वर्षांपूर्वी सुद्धा शेतकरी हक्काचे पैसे हात जोडून मागताना त्यांच्यावर शिरोळ येथे हल्लाकरून दिपक पाटील याला रक्तबंबाळ केलं.त्याच्या रक्ताचा हिशोब घेणार का? का हल्ला करून गावच्या भुमीपुत्राचे रक्त साडणाऱ्या साथ देणार हे या निवडणुकीत पहायला मिळणार असल्याने या विधानसभा निवडणुकीत सैनिक टाकळी गाव किंगमेकरची भूमिका बजावणार आहे.