हेरलेच्या तरूणानी मार्गावरील खड्डे मुजवून प्रशासनाचा डोळ्यात घातलं अंजन

 शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

कोल्हापूर सांगली राज्यमार्गाच्या डागडुजी कोणी वालीच नसल्याने वाहण धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.यामुळे दररोज छोटेमोठे आपघात होवून अनेक लोक किरकोळ तर काहीना कायमचे अपंगत्व आले याचा विचार करत आज हेरले गावातील तरूणानी माणुसकीचे दर्शन घडवत मार्गावरील खड्डे मुजवण्याचे काम केले.प्रशासनासने आम्ही केलेल्या कामाची दखल घेवून हा रस्ता लवकरात लवकर नवीन बनवून अशी या तरुणांकडून मागणी होत आहे.कोल्हापूर सांगली राज्य मार्गाची चाळण झाली असून वाहण धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यामुळे दररोज छोटेमोठे आपघात होवून अनेक लोक किरकोळ जखमी तर काहीना कायमचे अपंगत्व आले आहे याचा विचार करत आज हेरले गावातील तरूण मुलानी एकत्र येवून हेरले ते हालोंडी दरम्यानचे एक दिड फुटाचे खड्डे मुजवण्याचे काम केले यासाठी या तरूणानी राज्यमार्गच्या बाजूला असलेल्या विटभट्टी येथील खराब झालेल्या विटा व माती,मुरूम आणून हे एक दिड फुटाचे खड्डे मुजवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आज सकाळपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रवास करत असताना अनेक वाहणे पंचर तर काही गाड्यांचे किरकोळ अपघात झाले.हा अपघाताचा प्रकार आजचा नाही तर कित्येक महिन्यापासून सुरूच आहे.त्यामुळे आम्ही तरूणानी एकत्र येवून या रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम केले असल्याचे त्यानी सांगीतले. यावेळी आकाश काटकर, ओंकार काटकर, योगेश मिरजे, विजय पाटील, शुभम सोळुंखे,सोहम नाईक निखिल जाधव, ओम काटकर, ऋत्विक डोरले,आदित्य पाटील, साहिल गायकवाड, अजय काटकर, रवीराज गडकरी, मंदार गडकरी,यश गडकरी, नितीन कारंजे आदि उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!