पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
ऐन दिवाळी सणात धन संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना,पूजाअर्चा केल्याने अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते. आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधते या भ्रमात राहून शिरोलीतील एका कुटुंबाने लक्ष्मीपूजन करून घराचा दरवाजा रात्रभर उघडा ठेवला अणं…बाहेरील लक्ष्मी घरात ऐण्या ऐवजी घरातीलचं लक्षमीवर चोरट्यानी डला मारला.दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो.पाच दिवसांचा हा सण दिव्यांची आरास,फराळ,फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्साहात साजरा केला जातो.या पाच दिवसांचे एक आगळे वेगळे महत्त्व असून या पाच दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.या दिवशी लक्ष्मीची आराधना व पूजा केल्याने धन संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मी
अश्विन अमावस्येच्या रात्री सर्वत्र संचार करते.आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते.तिथे वास्तव्य करते असे अनेक अक्यायका आजवर अनेक ग्रंथातून किंवा लोकांच्या अख्यायिका ऐक्यातून लोकांच्या कानावर पडत असते.त्यामुळे लोकांची अंधश्रद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.अशाच अंधश्रद्धेच्या मोहापायी शिरोली पुलाची येथील सर्व सामान्य कुटुंबीयाने शुक्रवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात मनोभावे घरी लक्ष्मीपूजन करून रात्री बारा वाजेपर्यंत जागे राहून त्यानंर लक्ष्मी आपल्या घरी वास्तव्यास येईल या आशेने घराचा दरवाजा रात्रभर उघडा ठेवून कुटुंबीय झोपी गेले अन रात्रीत सकाळी ४० हजारांचा नवीन मोबाईल फोन अन लक्ष्मीपूजनासाठी घालण्यात आलेले सोन्याचे घंटन असा जवळपास दिड लाखाचा मुददेमाल अज्ञात चोरट्यानी रातोरात लांबवला.या घटनेची माहिती शिरोली पोलिसात या कुटुंबाने दिल्याने पोलिसानी घटनास्थळी धाव घेवून सर्व माहिती घेत शोध तपास चालू केला आहे.