“मोठी बातमी” हिंदुराव शेळके यांचा मदन कारंडे यांना जाहीर पाठींबा

भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके हे अपक्ष निवडणुकीच्या तयारीत असताना आज महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठींबा दिला.शेळके यांनी पाठिंबा दिल्यामुळे कारंडे यांना आणखीन बळ मिळणार आहे.यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अजितमामा जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींची उपस्थिती होती.भारतीय जनता पार्टीने आमदार प्रकाश आवाडे यांना भाजपमध्ये घेऊन त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी दिल्याने हिंदुराव शेळके यांनी बंड केले होते.आवाडेविरोधक म्हणून इचलकरंजी शहराला परिचित असलेले शेळके हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आल्याची भूमिका जाहीर केली होती.शेळके यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.त्यातच रविवारी त्यांनी आपण महाविकास आघाडी सोबत असून महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

Spread the love
error: Content is protected !!