शिरोळ / प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या युगात कौटुंबिक ऋणानुबंध नष्ट होत चालले आहे.याचे विपरीत परिणाम समाजावर घडत आहेत.यामुळे कौटुंबिक ऋणानुबंध घट्ट होण्याकरिता शिरोळमधील सावंत परिवाराने स्नेह मेळावा आयोजीत करून समाजाला आदर्श विचारांची दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील कल्लेश्वर मंदिरात शिरोळमधील संपूर्ण सावंत परिवाराच्यावतीने एक दिवसीय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याच्या माध्यमातून आजच्या तरुण-तरुणींना जुन्या लोकांची ओळख व्हावी ते काय काम करत होते.तसेच आजच्या तरुण पिढीची कुठे निवड झाली ते काय करतात याची माहिती संपूर्ण परिवारास मिळावी कौटुंबिक ऋणानुबंध घट्ट व्हावेत याकरिता हा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.उपस्थित महिलांना फेटे बांधून स्वागत करण्यात आले.संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली, स्नेह मेळाव्यात सहभागी कुटुंबांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.सर्वांनीच कार्यक्रमात हिरारीने सहभाग घेतल्यामुळे हा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.