राजाराम विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण, मोफत गणवेश वाटप
शिरोळ / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी त्यांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक संस्था मदतीचा हात पुढे करीत असतात. सामाजिक भान जपत येथील कर्तव्य फौडेंशनने राजाराम विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची काळजी घेतली आहे.असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी केले.येथील राजाराम विद्यालयात कर्तव्य फौडेंशनच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले या कॅमेराचा लोकार्पण सोहळा, व शासनाकडून आलेल्या गणवेशाचे वाटप,माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती,आणि वाचन प्रेरणादिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ भारती कोळी या बोलत होत्या शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख अण्णा मुंडे या समारंभाचे अध्यक्षस्थानी होते.सुरुवातीला प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांचा व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मारुती जाधव यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी केंद्रप्रमुख अण्णा मुंडे बोलताना म्हणाले की शाळेतील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य शाळेच्या प्रगतीसाठी झटत आहेत.त्याला कर्तव्य फौंडेशनची साथ मिळत आहे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.कर्तव्य फौडेंशनचे अध्यक्ष अमर माने यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कार्यवाहक सचिन देशमुख शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे, सदस्य चंद्रकांत भाट यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कर्तव्य फौंडेशनचे उपाध्यक्ष विनायक काळे, सदस्य योगेश गावडे, दीपक पाटील, किरण गाडगीळ, प्रदीप डकरे,गुरुदत्त गंगधर, नामदेव माने,शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ.शितल जगदाळे,सदस्या सौ. प्रियंका इंगळे,सौ ज्योती मांगले,शिक्षक प्रतिभा साळुंखे, रवींद्र वाघ,सौ.ज्योती गावडे यांच्यासह सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.