शाहुवाडी येथे वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप – आमदार विनय कोरे
कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
शाहूवाडी (ता.शाहूवाडी) येथे संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दाकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या सर्व योजनेंतर्गत पात्र ५४० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.शाहूवाडी तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व इतर योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या आत्तापर्यंत एकूण ४६०४ वर पोहचली आहे.तसेच येत्या काळात शाहूवाडी तालुक्यातील वंचित लाभार्थींपर्यंत पोहचून १० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले.तसेच तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक,सर्व गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,रास्त धान्य दुकानदार यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच सर्वांच्या प्रयत्नातून हे काम यशस्वीपणे पूर्ण केले त्याबद्दल शाहूवाडी-पन्हाळा तालुक्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सर्वांचे मनापासुन आभार मानले.यावेळी शाहूवाडी निवडणूक नायब तहसीलदार नरेंद्र गायकवाड, निवासी नायब तहसीलदार गणेश लव्हे,गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील,कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासो लाड,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील,युवराज बाबा काटकर,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत,शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे (आप्पा),युवराज पाटील,सुरेश नारकर यांच्यासह संजय गांधी निराधार समितीचे सर्व सदस्य,मंडल अधिकारी,सर्व गावचे तलाठी,सर्व पोलीस पाटील यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.