सर्वसामान्य जनता शरद पवार यांच्या पाठीशी : आर.के. पवार
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका पदाधिकारी नियुक्ती मेळावा संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
ज्यांना आयुष्यात उभा केलं,पाच वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री केलं.अशा अजित पवारांनी ईडीच्या भितीने गद्दारी केली.राज्यात,देशात शरद पवार यांना मानणारी जनता आहे.त्यामुळे आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे
आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करायचा आहे.भाजपनं जनतेला आश्वासन देवून जनतेची दिशाभूल केली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता शरद पवार यांच्या पाठीशी आहे त्यामुळे जनतेच्या भरवशाचं सरकार
निर्माण होणार आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आर.के.पवार यांनी केले.हेरवाड ता.शिरोळ येथे शिरोळ तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका पदधिकारी नियुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी स्वागत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी केले.प्रास्ताविकात तालुका महिला अध्यक्षा स्नेहा वसंतराव देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या नुतन कार्यकारिणी बरोबर पक्षवाढीसाठी तसेच महिला सबलीकरणासाठी ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी माने म्हणाल्या,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी जिल्हयात कार्य सुरु आहे.बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजेत.
या माध्यमातूनच घरोघरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोहचवणार असल्याचे सांगितले.शरद पवार यांनी महिलांना आरक्षणाच्या माध्यमानत जगण्याचे बळ दिले आहे.त्यामुळे शरद पवार यांच्या मागे जिल्ह्यातील महिला उभ्या असणार आहेत.
प्रांतिक सदस्य मदन कारंडे म्हणाले शरद पवार यांनी देशासाठी आणि राज्यासाठी मोठे कार्य केले आहे.शरद पवार यांना बाजूला ठेवून जे सोडून गेले ते गद्दार ठरले.आज सर्वसामान्य जनता शरद पवार यांच्याबरोबर आहे.त्यामुळे बाजूला गेलेल्यांना जनताच कायमचं बाजूला करेल.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे,जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे,पांडूरंग गायकवाड,संदीप बिरणगे यांची मनोगते झाली.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे वाटप करण्यात आली.यावेळी शिरोळ तालुका विधानसभा अध्यक्ष अभिजित पवार,कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी आलासे,
चंद्रकांत जाधव (घुणकीकर),बी.जी.माने(शिरोळ),कोल्हापूर शहर उपाध्यक्ष निता पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गणेश जाधव,सादिक अत्तार,हेरवाड सरपंच रेखा जाधव,उपसरपंच हयाचांद जमादार,चंद्रकला पाटील,तंटामुक्त अध्यक्ष सुभाष
देबाजे,पांडुरंग गायकवाड,सुरेश पांढरे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.सुत्रसंचलन दिलीप शिरढोणे यांनी केले.तर आभार वसंतराव देसाई यांनी मानले.