कोथळीतील तो नुकसानग्रस्त शेतकरी पोलिसात करणार तक्रार दाखल
कोथळी / प्रतिनिधी
कोथळी येथील साजणे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गट नंबर ४१६ या ऊस पिकात दक्षिण-उत्तर असलेल्या शिवेच्या बांधावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी
करण्यात आल्याने बांधाकडच्या सुमारे २०० फूट एका सरीतील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.तात्यासो अंकलगे या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.एक
जून 2023 रोजी उसाची लागण केली असून सहा महिन्याचे हे ऊस पीक आहे.आठ दिवसापूर्वी बांधाकडील एक सरीचा पाला वाळल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांनी त्या
उसाचा एक गड्डा काढून तपासणीसाठी लॅब मध्ये दिले असता,लॅबच्या रिपोर्ट प्रमाणे तन नाशकाच्या फवारणीमुळे हा ऊस वाळल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकाराबाबत बोलताना
तात्यासो अंकलगे म्हणाले एकाच सरीचा ऊस वाळल्याने मला शंका आल्याने तो लॅबला पाठवला कुणीतरी खोडसाळपणाने जाणून-बुजून तणनाशक फवारले आहे.मी याबाबतची
अज्ञाताविरुद्ध तक्रार पोलिसात करणार असल्याचे सांगितले.यावेळी सरपंच विजय खवाटे व काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली.एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान
होईल असे कृत्य कोणीही करू नये पोलिसांनीही या अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सरपंच खवाटे यांनी केली आहे.