शिरोळमध्ये नगर पथविक्रेत्याची निवडणूक बिनविरोध

शिरोळ / प्रतिनिधी

शहरात पथविक्रेत्यांची जागा निश्चित करणे त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नगरपथ विक्रेता समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्या अनुषंगाने शिरोळ शहर अंतर्गत येणाऱ्या पथविक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध झाली.

 

शिरोळ नगरपालिका अंतर्गत नगर पथविक्रेता समिती निवडणूक 2024 ची निवडणूक सुरु आहे.यात शिरोळ शहरातील नगर पथविक्रेत्यांची निवडणूक बिनविरोध झाली. 8 जागांसाठी 6 अर्ज दाखल झाले होते.

 

मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. यात अल्पसंख्याक महिला-सायराबानू कुरणे,अनुसूचित जाती महिला-उमा कदम, इतर मागासवर्ग- भारती बन्ने, खुला प्रवर्ग-विनायक गावडे व आण्णासो शेट्टी, खुला प्रवर्ग

 

 

महिला-शालन माने असे 6 जण बिनविरोध निवडून आले. तर अनुसूचित जमाती व विकलांग या दोन जागेसाठी अर्ज प्राप्त झाले नसल्याने या जागा रिक्त राहिल्या.

Spread the love
error: Content is protected !!