शिरोळ : प्रतिनिधी
युनिक स्कॉलर अबॅकस कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शिरोळमधील स्मार्टकीड अबॅकसची विद्यार्थिनी कु शौर्या जगदीश पाटील हिने सी 3 या विभागात प्रथम क्रमांक मिळवला.
कोल्हापूर येथील अक्षता मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.शौर्या पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवत शिरोळचा नावलौकिक केला.डॉ श्रद्धा जवारजल वर्षा दलिंबकर हरिहर ॲडवोकेट्स असोसिएशन दावणगिरीचे माजी अध्यक्ष ॲड रुद्रगोंडा पी यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शौर्या पाटील हिला गौरविण्यात आले.
शौर्या पाटील ही शिरोळचे माजी सरपंच व शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्व गजाननबापू पाटील यांची नात आहे.तिला स्मार्टकीड अबॅकसच्या शिक्षिका सौ मनीषा कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.सदर क्लासमधील 34 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.त्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच शौर्या पाटील हिचे वडील डॉ जगदीश पाटील,आई अध्यापिका सौ जयश्री पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.तिच्या या यशाबद्दल विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर शिरोळ मधील राधा महिला फौंडेशन श्री अण्णासाहेब पाटील दूध व्यवसायिक सहकारी संस्था विजयसिंह तरुण मंडळ यांच्यावतीने सत्कार कडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.