इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात नियमितपणे कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या संस्थेने रोटरी वर्ष २०२२-२३ मधील प्रांत ३१७० पातळीवरील सात महत्त्वाचे पुरस्कार मिळविले. यावेळी प्रांत पातळीवरील १५० क्लबमधून बेस्ट क्लब म्हणून रोटरी सेंट्रलचा गौरव करण्यात आला. त्या वेळचे अध्यक्ष अशोक जैन आणि सहकारी सदस्यांनी पुरस्कार चषक स्वीकारला.याचवेळी बेस्ट सेक्रेटरी म्हणून श्रीकांत राठी यांचा गौरव करण्यात आला तर बेस्ट असिस्टंट गव्हर्नर आणि ॲव्हेन्यू ऑफ सर्व्हिस ॲवार्ड प्रशांत कांबळे यांना प्रदान करण्यात आले.
याचबरोबर याप्रसंगी प्रांत पातळीवरील बेस्ट क्लब सर्व्हिस,बेस्ट व्होकेशनल सर्व्हिस,बेस्ट कम्युनिटी सर्व्हिस,बेस्ट क्लब बुलेटीन हे महत्त्वाचे पुरस्कार रोटरी क्लब सेंट्रलने मिळविले.कोल्हापूरमध्ये मुस्कान लॉन येथे झालेल्या ‘आशाए’ या वार्षिक परिषदेत गतवर्षीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे,माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते सदरचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.याप्रसंगी सध्याचे प्रांतपाल नासिर बोरसादवाला व सौ.सकिना बोरसादवाला तसेच प्रांत पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
रोटरी वर्ष २०२२-२३ मध्ये रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्यावतीने विद्यार्थी दत्तक योजना,हॅपी स्कूल,विविध शाळांना बेंच प्रदान व स्वच्छतागृह बांधणे, नेत्र शस्त्रक्रिया शिबिरे,अन्नोत्सव,व्याख्यानमाला,राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा,आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व व कला स्पर्धा इत्यादी कायमस्वरूपी उपक्रमांच्या बरोबरच इतर अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी या वर्षीचे अध्यक्ष नितीनकुमार कस्तुरे व सेक्रेटरी सुरेश चौगुले, अंबरीश सारडा, नागनाथ बसुदे, राधामोहन छापरवाल, अजय जाखोटिया, वसंत सपकाळे, सुभाष राठी, पन्नालाल डाळया, राजेश सुराणा, इत्यादी रोटरी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा भागातील रोटरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.